शिवसेनेच्या सुनावणीत टिप्पणी; ठाकरेंचा युक्तिवाद संपला
नवी दिल्ली :
शिवसेना पक्ष आणि चिन्ह तसेच आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात काल पुन्हा सुनावणी पार पडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला.
“आमदारांची टर्म संपली तरी सुप्रीम कोर्टाचा निर्णय महत्त्वाचा आहे. फूट पडलेली आहे की नाही याचा सोक्षमोक्ष लावा”, असे आवाहन देवदत्त कामत यांनी केले. कामत यांच्या या वक्तव्यानंतर “आमच्याकडे अधिकार आहेत यात काही शंका नाही”, अशी टिप्पणी कोर्टाने केली. देवदत्त कामत म्हणाले, आम्ही अध्यक्षांवरील विश्वास
गमावला. ज्या पद्धतीने सरकार तयार केले. त्यानंतर प्रतिज्ञापत्रक दाखल केले. दहाव्या सूचीनुसार सर्व घडले की नाही हे पाहणे विधानसभा अध्यक्षांचे काम होते. समोरच्या बाजूला उत्तर देण्याची संधी दिली. याचाच अर्थ अध्यक्ष त्यांना सिस्टिम मानायला लागले होते का?”, असा युक्तिवाद कामत यांनी केला. पक्ष-चिन्हाचा निर्णय झाला तर अराजकता माजेल. पक्षाची 2018 ची घटना असंवैधानिक आहे, असे शिंदेंच्या आयोगाकडील पत्रात नव्हते. आमदार संख्याबळावर निर्णय दिल्यास परिशिष्ट 10 कागदावर राहील आणि अराजकता माजेल, असा युक्तिवाददेखील कामत यांनी केला. फुटीची परवानगी नाही, फुटणारे अपात्र केले जावेत. विधिमंडळ पक्ष फुटल्यावर चिन्हाचा संबंध येत नाही. आयोगाने फक्त विधिमंडळातील संख्याबळाचा विचार केला. संख्याबळ बघून घेण्यात आला. अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले नाही.
त्यामुुळे आता सुप्रीम कोर्टाला
आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार आहे. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले. चिन्ह कुणाला द्यायचे नसेल तर ते गोठवा, असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला.
We have the authority to decide on the split!
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…