मनमाडला लागलेली वाहतूक कोंडीची साडेसाती कधी संपणार?

मनमाडला लागलेली वाहतूक कोंडीची साडेसाती कधी संपणार?

मनमाड : प्रतिनिधी

मनमाड शहर हे हे केवळ पाणीटंचाईसाठी प्रसिद्ध नसून वाहतूक कोंडी साठी देखील प्रसिद्ध आहे मनमाड शहरातून जाणारा इंदूर पुणे महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग असून शहरातून जाणाऱ्या या मार्गावर कायम वाहतूक कोंडी होत असते मनमाड शहरातून जाणारा एकमेव उड्डाणपूल अर्थात रेल्वे ओव्हर ब्रिज हा कायम वाहतूक कोंडीत अडकलेला असतो या पुलावर एखादी वाहन नादुरुस्त झाले किंवा एखाद्या गाडीचा  अपघात झाला तर येथे वाहतूक कोंडी ही निश्चित होणार म्हणजे होणार यामुळे बाहेरील वाहन चालकांना त्रास होतोच मात्र या सर्व गोष्टीचा मनमाड शहरातील नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो मनमाडला लागलेली वाहतूक कोंडी म्हणजे एक प्रकारे साडेसातीच असून ही साडेसाती कधी संपेल असा प्रश्न मनमाड शहरातील नागरिकांतर्फे करण्यात येत आहे

मनमाड शहर हे रेल्वे जंक्शन स्थानक असून मनमाड शहरात भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा गुरुद्वारा आहे इथून शिर्डी नस्तनपुर त्र्यंबकेश्वर सप्तशृंगी गड यासह इतर धार्मिक स्थळावर जाण्यासाठी जवळचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे यासह मनमाड शहरातून जाणारा इंदूर पुणे महामार्ग हा देशातील सगळ्यात सुरक्षित व सर्वच ठिकाणी पोहोचणारा महामार्ग आहे या सर्व गोष्टीमुळे मनमाड शहर प्रसिद्ध असले तरी पाणी टंचाईसाठी देखील मनमाड शहर प्रसिद्ध आहे आणि आता गेल्या काही वर्षापासून मनमाड शहराची ओळख शहरातून जाणारी इंदूर पुणे महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोडीमुळे देखील होत आहे याला कारण देखील तसेच असून वाहतूक कोंडी म्हणजे मनमाड शहराला लागलेली साडेसाती आहे आणि ही साडेसाती कधी संपेल असा सवाल मनमाड शहरातील जनतेकडून विचारण्यात येत आहे मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गावर शहराच्या दोन्ही भागाला जोडणारा रेल्वे ओव्हर ब्रिज आहे या ब्रिजवर एखादे वाहना दुरुस्त झाले किंवा मालेगाव कडील दहेगाव कुंदलगाव या भागात अपघात झाला किंवा एवढ्या कडे जाताना अनकवाडी अंक या भागात अपघात झाला तरी मनमाड शहरात वाहतूक कोंडीही होते या वाहतूक कोंडीचा वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत असून शहरातील नागरिकांना देखील याचा मोठा फटका बसत आहे मनमाड शहरात वाहतूक वाढण्याचे अजूनही कारणे असून त्यात मुख्य कारण म्हणजे सुप्रीम कोर्ट तर्फे धुळे औरंगाबाद महामार्गावर असलेला कन्नड घाट अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे याशिवाय मनमाड ते औरंगाबाद असलेला महामार्ग देखील अत्यंत खराब झाला असून या महामार्गावर एक एक दीड फुटाचे खड्डे पडलेले आहेत यामुळे येथून देखील मोठी वाहने जाण्यास टाळाटाळ करतात यामुळे पर्यायी मार्ग म्हणून मनमाडचा मार्ग अवलंबला जातो आणि याचमुळे मनमाड शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते ही वाहतूक कोंडी म्हणजे मनमाड शहराला लागलेली साडेसाती असून ही साडेसाती केव्हा संपेल असा प्रश्न वाहन चालकासह मनमाड शहरातील नागरिकांना पडला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *