नाशिक

त्र्यंबकेश्वरला महिलेची रस्त्यावरच प्रसूती

उपजिल्हा रुग्णालयाअभावी हाल; प्रशासनावर संताप

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथे मंगळवारी (दि. 29 सप्टेंबर) शंख-माळा विकणार्‍या एका महिलेची प्रसूती रस्त्याच्या कडेलाच झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. उपजिल्हा रुग्णालय शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर तळवाडे शिवारात स्थलांतरित केल्यामुळे गर्भवतींंसह सर्वसामान्य रुग्णांना फटका बसत आहे. या गंभीर समस्येकडे शासन यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे
त्र्यंबकेश्वरमध्ये शंख-माळा विक्रेते मागील 35 वर्षांपासून वास्तव्यास आहेत. कुंभारतळे वाहनतळ परिसरात पाल टाकून राहणारे हे कुटुंबीय मंदिर परिसरात शंख, माळा, रुद्राक्ष व इतर वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे पक्की घरे नसल्याने प्रसूतीच्या वेळी कुठे जावे, हा प्रश्न नेहमीच महिलांसमोर असतो.
या घटनेच्या दिवशी (29 सप्टेंबर) गर्भवती महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर ती उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पोहोचली; परंतु तेथे रुग्णालयाला कुलूप लावून पाडकामासाठी पत्र्यांचे बॅरिकेडिंग करण्यात आलेले होते. सोबतच्या महिलेने तिला तातडीने खासगी डॉक्टरांकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रस्त्याच्या कडेलाच तिची प्रसूती झाली आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. या घटनेचा एल्गार कष्टकरी संघटनेने तीव्र निषेध केला आहे. येत्या 31 ऑक्टोबरला राष्ट्रपती व राज्याचे मुख्यमंत्री त्र्यंबकेश्वर दौर्‍यावर येत असताना त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून देऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

हजारो कोटी रुपये कुंभमेळ्याच्या नावाखाली खर्च करणारे शासन त्र्यंबकेश्वरमध्ये माता आणि बालकांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करत आहे. गर्भवती महिलेला रस्त्यावर प्रसूतीची वेळ येणे ही दुर्दैवी बाब असून याबाबत मुख्यमंत्री महोदयांना जाब विचारण्यात येईल.
-भगवान मधे, संस्थापक अध्यक्ष, एल्गार कष्टकरी संघटना.

 

Woman delivers baby on the street in Trimbakeshwar.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

आखिर कब तक चुप रहेगी?

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥ भावार्थ : जिथे स्त्रीचा…

1 day ago

’रामायण’ची आधुनिक झेप

- मनीषा चौधरी चित्रपटसृष्टीत सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे, नितेश तिवारी दिग्दर्शित आणि…

1 day ago

व्हिटॅमिन बी-12 च्या मदतीने केली नवी रिचार्जेबल बॅटरी

- डॉ. किशोर पवार मानवी शरीरासाठी जीवनसत्त्वाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे याची कल्पना सर्वांनाच आहे.…

1 day ago

आत्महत्या हा उपाय नाही…

- ज्योती काळे-जाधव अलीकडच्या काळात घडणार्‍या आत्महत्यांच्या घटना मनाला अस्वस्थ करून जातात. पुण्याची पायल, काल…

1 day ago

दिवाळी संपली; फराळाच्या आठवणी कायम

- प्रणाली देशमुख तसा खूप मोठा परिवार आहे यांचा! पिढ्यान्पिढ्या आपल्याला अगदी मनपसंद, चमचमीत, तिखट-गोड…

1 day ago

दिशादर्शकांवर ‘भाऊ-दादां’ची मक्तेदारी!

- वाहिद बागवान रस्ता कुठे जातो, हे सांगण्यासाठी उभारलेल्या दिशादर्शक कमानींवर आता कोणत्या नेत्याचा वाढदिवस…

1 day ago