उन्हाळ्यापूर्वी काम पूर्ण करून पहिले चाचणी आवर्तन सोडण्याचे नियोजन; आमदार कोकाटेंकडून कामाची पाहणी
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी गावांना निळवंडे धरणाचे पाणी मिळावे, यासाठी सुरू असलेल्या वितरिकांच्या कामांना गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाटबंधारे विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल चोपडे यांच्यासह कहांडळवाडी, मलढोण व सायाळे परिसरातील कामांची पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला. उन्हाळ्यापूर्वी वितरिकांची कामे पूर्ण करून पहिले चाचणी आवर्तन सोडण्याचे नियोजन असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील वारेगाव, मलढोण, दुशिंगपूर, सायाळे आणि कहांडळवाडी या गावांना निळवंडे धरणाचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाइपलाइनद्वारे वितरिका टाकण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे पूर्व भागातील मोठे क्षेत्र सिंचनाखाली येण्याची अपेक्षा आहे.
या कामांच्या पाहणीदरम्यान कोकाटे यांनी अधिकार्यांकडून कामाची प्रगती, पाइपलाइनची स्थिती आणि प्रत्यक्ष सिंचनासाठी आवश्यक बाबींची माहिती घेतली. तसेच शेतकर्यांशी संवाद साधून वितरिकांमुळे शेतापर्यंत पाणी पोहोचविताना येणार्या अडचणी जाणून घेतल्या. कामातील अडथळे तातडीने दूर करून गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या.
पूर्व सिन्नरचा दुष्काळी पट्टा बारमाही बागायती करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. भोजापूर धरण, देवनदी पूरचारी आणि निळवंडे धरणाच्या माध्यमातून या भागाला सिंचनाचा आधार देण्याचे नियोजन आहे. दुष्काळी परिस्थितीत देवनदी पूरचारीचा शेतकर्यांना मोठा फायदा झाला आहे. भविष्यात कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा निर्माण करण्यावर भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निळवंडेच्या पाण्याचा पूर्व सिन्नरमधील अधिकाधिक गावांना लाभ मिळावा यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत चर्चा करून पाठपुरावा सुरू असल्याचेही कोकाटे यांनी सांगितले.
यावेळी विठ्ठल उगले, विजय काटे, रामनाथ कर्पे, विजय सोमाणी, बबन कहांडळ, संदीप कर्पे, राहुल कहांडळ, मधुकर भेंडाळे, नबाजी खरात, सखाराम कहांडळ, सुनील पवार, रवींद्र खरात, बापूसाहेब घोटेकर, हौशीराम घोटेकर, शिवाजी हालवर, दगडू बोंबले, किसन पावले, सुधाकर शिंदे, सुभाष शिंदे, तुकाराम शिंदे, पंडित चासकर उपस्थित होते.
शेतकर्यांनी मांडल्या अडचणी
कहांडळवाडी, सायाळे आणि मलढोण येथे पाहणीदरम्यान शेतकर्यांनी वितरिकांच्या कामांसह भविष्यातील सिंचन व्यवस्थेबाबतच्या अडचणी मांडल्या. पाण्याचे योग्य नियोजन, पाइपलाइनचे काम आणि प्रत्यक्ष शेतापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत संबंधित अधिकार्यांनी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना कोकाटे यांनी दिल्या.
बारमाही पाण्याचे नियोजन
पूर्व सिन्नरचा दुष्काळी पट्टा सिंचनाखाली आणून हा भाग बारमाही बागायती करण्यासाठी भोजापूर, देवनदी पूरचारी आणि निळवंडेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. वितरिकांची कामे वेळेत पूर्ण करून शेतकर्यांना प्रत्यक्ष पाणी मिळणे, हेच पुढील उद्दिष्ट आहे.
– माणिकराव कोकाटे, आमदार
Nilwande water for the drought-prone belt in eastern Sinnar; work on distributaries gains momentum.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥ भावार्थ : जिथे स्त्रीचा…
- मनीषा चौधरी चित्रपटसृष्टीत सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे, नितेश तिवारी दिग्दर्शित आणि…
- डॉ. किशोर पवार मानवी शरीरासाठी जीवनसत्त्वाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे याची कल्पना सर्वांनाच आहे.…
- ज्योती काळे-जाधव अलीकडच्या काळात घडणार्या आत्महत्यांच्या घटना मनाला अस्वस्थ करून जातात. पुण्याची पायल, काल…
- प्रणाली देशमुख तसा खूप मोठा परिवार आहे यांचा! पिढ्यान्पिढ्या आपल्याला अगदी मनपसंद, चमचमीत, तिखट-गोड…
- वाहिद बागवान रस्ता कुठे जातो, हे सांगण्यासाठी उभारलेल्या दिशादर्शक कमानींवर आता कोणत्या नेत्याचा वाढदिवस…