नाशिक

ठक्कर बझार स्थानकात बसखाली चिरडून युवती ठार

नाशिक : प्रतिनिधी

ठक्कर बझार बसस्थानकात शेवटच्या श्रावणी सोमवारच्या झालेल्या गर्दीत बसच्या चाकाखाली चिरडून एका सतरावर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. आकांक्षा रामभाऊ शेलार असे या युवतीचे नाव आहे. याबाबत सरकारवाडा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. रविवारी (दि.6) शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वरला जाणार्‍या भाविकांची ठक्कर बझार बसस्थानकावर मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत प्रवाशांनी भरलेली बस निघाली. मात्र, चालकाला अंदाज न आल्याने आकांशा शेलार ही बसच्या चाकाखाली आल्याने चिरडली गेली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. श्रावणातील शेवटच्या सोमवारी देखील भाविक त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीची फेरी मारतात, त्यामुळे रविवारी मोठ्या प्रमाणात भाविक आले होते. याच गर्दीमुळे आकांक्षाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक तपास सरकारवाडा पोलीस करीत आहेत.

Young woman crushed to death under bus at Thakkar Bazaar station.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

5 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

5 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

5 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

5 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago