ध्वनिप्रदूषणावर कारवाईसाठी महापालिकेवर निषेध मोर्चा
पुणे : प्रतिनिधी
शहरातील विविध सण, उत्सव आणि मिरवणुकांमध्ये वाढलेल्या कर्णकर्कश डीजे आणि लाउडस्पीकरच्या दणदणाटाविरोधात पुणेकरांच्या संयमाचा बांध अखेर फुटला आहे. शहरात दिवसेंदिवस वाढणार्या ध्वनिप्रदूषणाचा निषेध नोंदवण्यासाठी रविवारी सकाळी शेकडो पुणेकर रस्त्यावर उतरले.
’लाउडस्पीकरविरोधी पुणेकर मंचा’च्या नेतृत्वाखाली बालगंधर्व चौकातून सुरू झालेला हा निषेध मोर्चा जंगली महाराज रस्त्यावरून मार्गक्रमण करत पुणे महापालिकेवर धडकला. यावेळी आंदोलकांनी हातात फलक घेऊन ’डीजेबंदी झालीच पाहिजे’ अशा जोरदार घोषणा देत प्रशासनाविरोधात आपला तीव्र संताप व्यक्त केला. या मोर्चात शहरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, अलीकडच्या काळात धार्मिक, जातीय किंवा राजकीय मिरवणुका आणि उत्सवांच्या नावाखाली ध्वनिप्रदूषणाच्या सर्व नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. या कर्णकर्कश आवाजामुळे लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती आणि प्राण्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना हृदयविकार व बहिरेपणाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी एकमुखाने करण्यात आली.
फौजदारी गुन्हे दाखल करा
मोर्चाच्या समारोपानंतर ’लाउडस्पीकरविरोधी पुणेकर मंचा’च्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त, पुणे महानगरपालिका आयुक्त आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांना यासंदर्भात सविस्तर निवेदन दिले. या निवेदनात, ध्वनिप्रदूषणाचे नियम मोडणार्यांवर केवळ नोटिसा न देता त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच नियमबाह्य डीजे यंत्रणा तत्काळ जप्त करण्यात याव्यात, अशी स्पष्ट आणि प्रमुख मागणी केली आहे.
Pune residents take to the streets against DJ noise
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…