नाशिक

बाजार समितीच्या आवारात तुटलेल्या ढाप्यांवर खोक्याचा उतारा

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळच असलेल्या ढाप्यावर ठेवलेले लाकडाचे खोके. 

बाजार समितीच्या आवारातील ढाप्याची झालेली दुरवस्था.

पंचवटी : प्रतिनिधी
नाशिक कृषी उत्पन्न बाजारच्या दिंडोरी रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळच असलेल्या तुटलेल्या ढाप्यावर बाजार समिती प्रशासनाने खोक्याचा उतारा दिला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या आवारातील समस्यांकडे लक्ष आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जिल्ह्याच्या विविध भागातून चारचाकी वाहनांमधून पालेभाज्या, फळभाज्या विक्रीसाठी आणल्या जातात. तसेच लिलाव झाल्यानंतर याच बाजार समितीतून राज्याच्या विविध भागांत भाजीपाला पाठविण्यात येत असतो. त्यामुळे या आवारात अवजड वाहनांसह चारचाकी, रिक्षा, दुचाकींचा वावर असतो. रात्री उशिरापर्यंत बाजार समितीच्या आवारात पालेभाज्यांचे लिलाव होत असतात. परंतु याच बाजार समितीच्या आवारातील ढाप्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळच असलेल्या चेंबरवरील ढापा तुटलेला असून, त्यावर मात्र बाजार समिती प्रशासनाने एक मोठे लाकडी खोके ठेवल्याचे चित्र बघायला मिळाले. जर याच ठिकाणाहून रात्रीच्या वेळी एखादे मोठे वाहन अथवा रिक्षा किंवा दुचाकी गेली तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाच प्रकारे बाजार समितीच्या आवारातील अनेक ढापे तुटल्याचे चित्रदेखील बघायला मिळत असून, याकडे बाजार समिती प्रशासन अपघात झाल्यावर दखल घेणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

 

Editorial Team

Recent Posts

राज्यसभेची उमेदवारी भुजबळ यांच्याऐवजी या नेत्याला, तटकरे यांनी दिली माहिती

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…

5 hours ago

पावसाच्या सरींसोबतच घरोघरी लोणचे बनवण्याची लगबग

बाजारात गावरान कैर्‍यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…

2 days ago

त्र्यंबकेश्वरमध्ये अनिर्बंध लॉजिंग बांधकामांना वेग

कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…

2 days ago

‘धाडसत्र’ केवळ ‘दिखावा’ ठरू नये…

ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्‍या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…

2 days ago

राजं छत्रपती झालं!

सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…

2 days ago

इबोलाचा नवा अवतार

इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…

2 days ago