नाशिक

‘एफडीए’च्या तपासणी मोहिमेत तुपाचा साठा जप्त

नाशिक : प्रतिनिधी
सणासुदीच्या काळात दूध व दुग्धजन्य पदार्थ जसे पनीर, खवा, मावा इत्यादी खाद्यपदार्थांना मागणी असते. ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ या मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने मिठाई व तत्सम पदार्थ तपासणी मोहीम जिल्ह्यात सुरू केली आहे.
या तपासणी मोहिमेत एकूण रुपये एक लाख 35 हजार 790 किमतीचा संशयित तुपाचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन सहआयुक्त (अन्न) दि. ज्ञा. तांबोळी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.
अन्न व औषध प्रशासनाला 11 सप्टेंबर 2025 रोजी मे. रामदेव ट्रेडिंग कंपनी, आशानगर कॉलनी, भगवती निवास, व्यापारी बँकेजवळ, नाशिकरोड, नाशिक यांच्या पेढीत कमी दर्जाचे तूप विक्रीसाठी असल्याच्या संशयावरून या पेढीची तपासणी केली असता, या पेढीत विक्रीसाठी असलेल्या संशयित तुपाचा साठा आढळून आला. संशयित तुपाचा 1 नमुना घेऊन उर्वरित 31 हजार 390 किमतीचा 43 लिटर साठा जप्त करून सुरक्षित ठेवण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाला 17 सप्टेंबर 2025 रोजी मे. श्री. स्वामिनाथ ट्रेडर्स, जयभवानी रोड, नाशिक यांच्या पेढीत कमी दर्जाचे तूप विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार या पेढीची तपासणी केली असता, पेढी विनापरवाना तूप या अन्नपदार्थाची विक्री करीत असल्याचे आढळून आले. या पेढीत विक्रीसाठी असलेल्या संशयित तुपाचे 2 नमुने घेऊन उर्वरित रुपये 1 लाख 4 हजार 400 किमतीचे 145 लिटर साठा जप्त करून सुरक्षित ठेवण्यात आला आहे. जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेकडून या अन्नपदार्थांचा अहवाल प्राप्त होताच अन्नसुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे. सदर कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी अमित रासकर यांनी सहाय्यक आयुक्त (अन्न) मनीष सानप, सहआयुक्त (अन्न) दिनेश तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाची पथके शहरातील पनीर व खवा उत्पादक यांच्यावर लक्ष ठेवणार असून, अन्न व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा व मानके कायदा, नियमानुसार निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे. सण-उत्सव काळात नागरिकांनी मिठाई व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना दक्षता घ्यावी. तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थांसंदर्भात तक्रार तसेच गोपनीय माहिती असल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 यावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात
आले आहे.

 

Editorial Team

Recent Posts

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…

1 hour ago

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

1 hour ago

साखर कारखानदारीची घरघर थांबणार कधी?

- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…

1 hour ago

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

2 hours ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

2 hours ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

2 hours ago