नाशिक

गणेशोत्सवात नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

अपर पोलीस अधीक्षक विमला एम. : निफाडला शांतता समितीची बैठक

निफाड : विशेष प्रतिनिधी
गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा कायम ठेवून साजरा करावा, नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा नाशिक ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षक विमला एम. यांनी दिला.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निफाड पोलीस ठाण्यातर्फे नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील देवकृपा बँक्वेट हॉलमध्येे शांतता कमिटीच्या बैठकीत त्यांनी हा इशारा दिला. व्यासपीठावर निफाडचे पोलीस उपअधीक्षक कांतीलाल पाटील, पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, वाल्मीक कापसे, नायब तहसीलदार राहुल मुळीक, नगरसेवक मुकुंदराजे होळकर, संदीप जेऊघाले, शारदा कापसे, साहेबराव बर्डे, मयुरी नवले, सोनल फडोळ, नंदकुमार कापसे आदी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी पोलीस निरीक्षक अहिरराव यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर नूरभाई शेख, लक्ष्मण आहेर, उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे तसेच पोलीस उपअधीक्षक कांतीलाल पाटील यांनी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने विविध विषयांवर उपस्थितांशी संवाद साधला. नशामुक्त भारत या संकल्पनेवर घेतलेल्या चित्रकला स्पर्धेचे तसेच उत्कृष्ट गणेश मंडळे यांना बक्षीस व सन्मानपत्र वितरण करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक विमला एम. यांनी गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. गणेश मंडळांनी शासन तसेच पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे स्पष्ट केले. गणेश मंडप उभारणी, मिरवणुका, ध्वनिक्षेपकांचा वापर, वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था याबाबत गणेश मंडळांनी विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सलोखा अधिक दृढ करण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. उत्सवादरम्यान शासनाचे नियम अथवा पोलीस प्रशासनाच्या सूचनांचे पालन न करणार्‍या गणेश मंडळांवर तसेच संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अपर पोलीस अधीक्षक विमला एम. यांनी दिला. बैठकीचे सूत्रसंचालन अभिजित डुकरे यांनी केले. अरविंद ढवळे यांनी आभार मानले. कपालेश्वर ढिकले, धनंजय जाधव यांनी अधिक परिश्रम घेतले.

मंडळांनी शासनाच्या सूचनांचे पालन करावे

गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असून, तो शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी नागरिक, गणेश मंडळे आणि पोलीस प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. निफाड शहर व परिसरातील सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आदर्श पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

Action to be taken for violating rules during Ganeshotsav.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिहस्थ सोहळ्यासाठी नाशिकमध्ये कडेकोट बंदोबस्त

तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…

4 days ago

झाडे तोडली तर पाखरांनी परत जायचे कुठे?

पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…

4 days ago

सत्ताधार्‍यांना धक्के

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…

4 days ago

कुंभमेळ्याच्या जागेसाठी शासनाने ठोस भुमिका घ्यावी

नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…

4 days ago

ध्वजारोहणासाठी शहर भगवेमय

चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…

4 days ago

फिरायला जाताय, एनसीएमसी कार्ड नोंदणी केली का?

आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…

4 days ago