नाशिक

येवल्यात नायलॉन मांजा वापरावर बंदी

मांजाचा वापर केल्यास कडक कारवाईचा मुख्याधिकार्‍यांचा इशारा

येवला : प्रतिनिधी
पुढील जानेवारी महिन्यात मकरसंक्रांत आहे. या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्यासाठी शहरात काही दुकानदारांकडून नायलॉन मांजा छुप्या पद्धतीने विक्री करण्यात येत आहे. सदर नायलॉन मांजावर बंदी असताना कोणत्याही विक्रेत्याने सदर मांजाची विक्री केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा येवला नगरपालिकेचे
मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
मुख्याधिकारी आहेर यांनी म्हटले आहे की, येवला शहरात नायलॉन मांजाचा वापर कोणीही करू नये, नायलॉन मांजामुळे नागरिक, बालक, दुचाकीस्वार, पक्षी तसेच जनावरांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होत असून, अनेक अपघात व गंभीर दुखापतींच्या घटना समोर येत आहेत. हा धोका लक्षात घेता नायलॉन मांजाचा वापर पूर्णतः बंद करणे आवश्यक आहे. नायलॉन मांजा हा कायद्याने बंदी घालण्यात आलेला असून, त्याची विक्री, साठवणूक तसेच वापर करणे हा गुन्हा आहे. तरीही काही ठिकाणी बेकायदेशीररीत्या या मांजाची विक्री होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे अनेक दुचाकीस्वारांच्या गळ्याला गंभीर जखमा झाल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. तसेच, हा मांजा घातक असल्याने पक्ष्यांचे पंख कापले जाणे, त्यांचा मृत्यू होणे अशा हृदयद्रावक घटना सातत्याने घडत आहेत. येवला नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सर्व नागरिक, दुकानदार, पतंग विक्रेते व पालक यांनी याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे. नायलॉन मांजाऐवजी केवळ सुताचा मांजा वापरण्याचे निर्देश देण्यात आले असून, पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचे आवाहन केले आहे.
शहरात नायलॉन मांजाची विक्री करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून, संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही मुख्याधिकारी आहेर यांनी दिला आहे. दरम्यान, नगरपरिषद, पोलीस प्रशासन व संबंधित विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे येवला शहरात तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहितीही पत्रकात मुख्याधिकारी आहेर यांनी दिली आहे.

शहरातील नागरिकांनी स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन नायलॉन मांजाचा वापर टाळावा, प्रशासनास सहकार्य करावे व कोणत्याही ठिकाणी नायलॉन मांजाची विक्री होत असल्याचे आढळल्यास तत्काळ नगरपरिषद किंवा पोलीस प्रशासनाला कळवावे.
-तुषार आहेर, मुख्याधिकारी, नगरपरिषद, येवला

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

20 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

20 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

20 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

20 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

21 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

21 hours ago