महाराष्ट्र

शेतकर्‍यांचे अश्रू पुसता आले, हीच माझ्यासाठी दिवाळी : मुख्यमंत्री

नागपूर : प्रतिनिधी
दिवाळीचा सण मंत्रालयात नाही, तर शेतकर्‍याच्या बांधावर साजरा करायचा, या निर्धाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. 7) रात्रीपासून रविवारपर्यंत नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांचा दौरा केला.
लोहारी सावंगा येथे मुक्कामानंतर रविवारी (दि. 8) सकाळी त्यांनी सोनेगाव आणि कळमेश्वर तालुक्यातील कोहळी येथे थेट शेतात जाऊन कापूस आणि तूर पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकर्‍यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसता आले, हीच माझ्यासाठी खरी दिवाळी असल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
फडणवीस यांच्या या दौर्‍याचे व शेतकर्‍यांसोबत दिवाळी साजरी करण्याचे

पंतप्रधानांनी कौतुक केले आहे.
मुख्यमंत्री फक्त बैठकीतून नव्हे, तर बांधावर जाऊन पाहणी करत आहेत, हा संदेश या दौर्‍यातून देण्यात आला. आता शेतकर्‍यांची नजर उर्वरित मदत, पीकविमा आणि रब्बीसाठी पाण्याची व्यवस्था याकडे लागली आहे. शनिवारी सायंकाळी सुमारे 7.30 वाजता फडणवीस नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे पोहोचले. आधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिरात दर्शन घेतले. नंतर शेतकरी रामभाऊ आणि अरुणाताई बालपांडे यांच्या कौलारू घरात मुक्काम केला. बालपांडे कुटुंबाची 10 एकर शेती आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, सोयाबीन पेरले, पण शेंगा लागल्याच नाहीत, शेवटी त्यावर रोटर मारावा लागला. विहिरीत पाणीच उरले नाही, त्यामुळे कापूस आणि मोसंबी बागेला पाणी द्यायला नाही. मोसंबीला भाव नाही, बांगलादेशने आयात थांबवली, बोअर मारायला परवानगी नाही.
गावात सुमारे 100 शेतकरी-ग्रामस्थांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, हे आव्हानांचे वर्ष आहे. पाऊस शेवटपर्यंत लपंडाव खेळत राहिला. परिणामी पिकांचे नुकसान झाले, शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. काही भागात चारा आणि पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांच्या डोळ्यातील अश्रू पुसता आले, हीच माझ्यासाठी खरी दिवाळी!
या गावासाठी त्यांनी 10 शेतकर्‍यांना सिंचन विहिरी मंजूर केल्या आणि 2 कोटी 43 लाख 35 हजार रुपये खर्चाचा साठवण तलाव उभारण्याचा निर्णय जाहीर केला. बालपांडे कुटुंबातील तिन्ही खातेदारांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

कापसाची बोंडेच फुटली नाहीत
रविवारी सकाळी लोहारी सावंगाहून निघाल्यानंतर फडणवीस यांनी सोनेगाव येथील दिलीप सरोदे यांच्या शेतात जाऊन कापूस पिकाची पाहणी केली. पावसाअभावी कापसाची वाढच झाली नाही, बोंड फुटलीच नाहीत, त्यामुळे शेतकर्‍यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे, हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले.
कापूस आणि तूर दोन्ही सुकले
त्यानंतर कळमेश्वर तालुक्यातील कोहळी येथे शेतकरी बाबुराव काळे यांच्या शेताला भेट दिली. तिथे कापूस आणि तूर पिकांची पाहणी करताना फडणवीस म्हणाले की, दीर्घकाळ पाऊस न झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. संकटात असलेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.
विदर्भात कापूस आणि तूर ही पावसावर अवलंबून असलेली प्रमुख पिके आहेत. पाऊस लांबल्याने दोन्ही पिके करपली आहेत, हे या दौर्‍यात पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

पंतप्रधान मोदींकडून कौतुक
फडणवीस यांच्या या दौर्‍याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले. एक्स वर त्यांनी लिहिले – लोहारी सावंगा गावात शेतकर्‍यांसोबत दिवाळी साजरी करणे आणि अरुणाबाई-रामभाऊ बालपांडे यांच्या घरी राहणे, ही कृती मनाला स्पर्श करणारी आहे.

Being able to wipe away the tears of farmers—that, for me, is Diwali: Chief Minister

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

ऐकणारे कान…

- सुप्रिया सुरवाडे सध्याचा घडीला माणसाला काय हवं आहे माहिती...? या शुष्क होत जाणार्‍या जगात...कोरड्या…

7 hours ago

नरक चतुर्दशी

- जगन घाणेकर स्त्रीसन्मानाचा आणि उदारतेचा संदेश देणारी वसुबारस आणि धनत्रयोदशी हे दिवाळीतीलच सण असले,…

7 hours ago

दीपावलीचा आनंद द्विगुणित व्हावा!

- आनंदा जाधव एरवी दीपावलीत पंधरा दिवस अगोदर गजबणार्‍या बाजारपेठेत यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे वसुबारसपासून गर्दीचा…

7 hours ago

’स्वीकृत’च्या निवडणुकीतील फुसका फटका

- गोरख काळे कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राज्यात ऐन दिवाळीत राजकीय फटाक्यांची जोरदार आतषबाजी…

8 hours ago

बायबाय ‘सीआर सेव्हन’!

- सचिन अहिरराव मैदानावर चेंडू पायाशी आला की, प्रतिस्पर्ध्यांच्या काळजाचा ठोका चुकायचा... वेगवान धाव, चपळ…

8 hours ago

माळी कुटुंबाने दुःखाच्या अंधारात पेटवला माणुसकीचा दिवा

पतीच्या मेंदूमृत्यूनंतर पत्नीचा अवयवदानाचा हृदयस्पर्शी निर्णय नाशिक : प्रतिनिधी दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि नव्या…

8 hours ago