महाराष्ट्र

विलीनीकरण हवे कोणाला?

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा अधूनमधून होत असते. शरद पवार यांनी 28 सप्टेंबर 2026 रोजी मुंबईतील वरिष्ठ नेते आणि पदाधिकार्‍यांच्या बैठकीत, तसेच त्याआधी 28 जुलै 2026 रोजी बारामतीत पत्रकारांशी बोलताना विलीनीकरणाची शक्यता स्पष्टपणे फेटाळली होती. ’आमचा पक्ष कोणत्याही गटात विलीन होणार नाही किंवा आम्ही भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (एनडीए) जाणार नाही. आम्ही एक स्वतंत्र राजकीय संघटना म्हणून स्वतःला अधिक मजबूत करू आणि निवडणूक लढू,’ असे विधान शरद पवार यांनी सप्टेंबरमध्ये केले होते. ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी आमच्यासोबत यावे. आम्ही कोणासोबत जाणार नाही, असेही ते म्हणाले होते. एका बाजूने इतकी स्पष्टता असतानाही राजकीय वर्तुळात विलीनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सहा वरिष्ठ नेत्यांनी चालू नोव्हेंबरच्या सुरुवातीला दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर विलीनीकरणाची चर्चा होऊ लागली आहे, हे विशेष! अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांनी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात शरद पवार यांची 5 नोव्हेंबर रोजी भेट घेतली. आपण 10 नोव्हेंबरनंतर बोलू, असे पवारांनी म्हटल्याचे पटेल यांनी सांगितल्यानंतर चर्चेला वेग आला. प्रकृती ठीक नसताना रुग्णालयात शरद पवारांनी पटेल यांच्याशी राजकीय विषयावर काही बोलणे केले असेल काय, हा प्रश्न आहे. शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने एनडीए किंवा भाजपासोबत यावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारला मतदारसंघांची संख्या वाढवून महिला आरक्षण द्यायचे आहे. त्यासंबंधीचे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होऊ शकले नाही. तेच विधेयक नव्याने मांडून मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी शरद पवारांची गरज सरकारला वाटत आहे. शरद पवार सोबत आले, तर इतर विरोधी पक्षांना ते बरोबर आणू शकतील, असे मोदी-शहा यांना वाटत आहे. त्यासाठीच भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण हवे आहे. केंद्रात सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही मंत्री नाही. भाजपाने राज्यमंत्रिपद देऊ केले होते; परंतु आधी कॅबिनेट मंत्रिपद असताना राज्यमंत्रिपद म्हणजे पक्षाचा अवमान असे म्हणत राष्ट्रवादीने ते नाकारले होते. आम्हाला केंद्रात दोन मंत्रिपदे द्या, अशी मागणी पक्षाने भाजपाकडे दोन-तीन महिन्यांपूर्वी केली होती, तेव्हा राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाल्यावर दोन मंत्रिपदे देऊ, असे भाजपकडून सांगितले गेल्याचे बोलले जात होते. त्यावेळी सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार असल्याची चर्चा होती. नंतर सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांची खासदारांसमवेत भेट घेतली होती. ही भेट मतदारसंघातील कामासंबंधी होती, असे सांगण्यात आले होते. आता पुन्हा विलीनीकरणाची चर्चा होत आहे. प्रश्न विलीनीकरण कसे असणार, हा मोठा प्रश्न आहे. पक्षाची सूत्रे (अध्यक्ष) कोणाकडे असतील, कोणी कोणाच्या पक्षात विलीन व्हायचे, कोणाचे पक्षचिन्ह स्वीकारायचे असे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, शरद पवार भाजपसोबत किंवा एनडीएसोबत जातील काय? हा प्रश्न आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि इतर नेते जे काही बोलत आहेत, त्यांना सुनेत्रा पवार यांचे समर्थन आहे की नाही, हे स्पष्ट नाही. तटकरे व पटेल यांना मध्यंतरी सुनेत्रा पवार यांनी डावलले होते. सुनेत्रा पवार विलीनीकरणाविषयी काहीही बोलत नाहीत. विलीनीकरण कोणाला हवे आहे? भाजपाला? शरद पवारांना? सुनेत्रा पवारांना? काही नेत्यांना? पक्ष फुटल्यानंतर परत एकत्र येण्याची भाषा करणे सोपे असते, पण प्रत्यक्ष कार्यवाही करणे अवघड असते, हे सत्य. अजितदादा हयात असते तर आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसल्या असत्या. 12 फेब्रुवारी 2026 रोजी दोन्ही पक्षांचे विलीनीकरण झाले असते, असा दावा तटकरे यांनी केला आहे. अजित पवार यांच्या हयातीत विलीनीकरणाबाबत निश्चितपणे चर्चा झाली होती. एवढेच नव्हे, तर विलीनीकरण कसे होणार, याबाबतही अजितदादांनी भूमिका स्पष्ट केली होती. मी (तटकरे) अजितदादांचा जवळचा सहकारी होतो. त्यामुळे या विषयाची मला पूर्ण माहिती आहे. त्यांच्या प्रखर इच्छाशक्तीतून विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असती, असाही दावा तटकरे यांनी केला. तटकरे यांच्या दाव्यात तथ्य आहे. अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झाले. मात्र, निधन झाले आणि त्यानंतर पुढील घडामोडी घडू शकल्या नाहीत. अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांनीही विलीनीकरणाच्या चर्चांना दुजोरा दिला होता. शरद पवार यांनी 12 फेब्रुवारी ही संभाव्य तारीख असल्याचे सांगितले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनीही अजित पवार यांच्याशी या संदर्भात चर्चा झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून ठोस चर्चा झाली नाही. केवळ मीडियातून चर्चेला फोडणी दिली जात आहे. शरद पवार यांनी सप्टेंबर महिन्यात आपली भूमिका स्पष्ट केली आहे, तरी सुनेत्रा पवार यांच्या गटातील नेत्यांना विलीनीकरण हवे आहे, असे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे. विलीनीकरणासाठी पडद्यामागून भाजपा सूत्रे हलवत असेल, तर शरद पवार यांचे मन वळवणे म्हणावे तितके सोपे नाही. सत्ता असो वा नसो, शरद पवारांना काही फरक पडत नाही, पण ते कधी भूमिका बदलतील, याचा काही भरवसा नाही. याचा विचार दुसर्‍या गटाला नाही, याचा विचारही सुनेत्रा पवार यांना करावा लागेल. काहीही झाले तरी शरद पवार स्वतःचे महत्त्व कमी होऊ देणार नाहीत.

Who wants the merger?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

ऐकणारे कान…

- सुप्रिया सुरवाडे सध्याचा घडीला माणसाला काय हवं आहे माहिती...? या शुष्क होत जाणार्‍या जगात...कोरड्या…

7 hours ago

नरक चतुर्दशी

- जगन घाणेकर स्त्रीसन्मानाचा आणि उदारतेचा संदेश देणारी वसुबारस आणि धनत्रयोदशी हे दिवाळीतीलच सण असले,…

7 hours ago

दीपावलीचा आनंद द्विगुणित व्हावा!

- आनंदा जाधव एरवी दीपावलीत पंधरा दिवस अगोदर गजबणार्‍या बाजारपेठेत यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे वसुबारसपासून गर्दीचा…

7 hours ago

’स्वीकृत’च्या निवडणुकीतील फुसका फटका

- गोरख काळे कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राज्यात ऐन दिवाळीत राजकीय फटाक्यांची जोरदार आतषबाजी…

7 hours ago

बायबाय ‘सीआर सेव्हन’!

- सचिन अहिरराव मैदानावर चेंडू पायाशी आला की, प्रतिस्पर्ध्यांच्या काळजाचा ठोका चुकायचा... वेगवान धाव, चपळ…

8 hours ago

माळी कुटुंबाने दुःखाच्या अंधारात पेटवला माणुसकीचा दिवा

पतीच्या मेंदूमृत्यूनंतर पत्नीचा अवयवदानाचा हृदयस्पर्शी निर्णय नाशिक : प्रतिनिधी दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि नव्या…

8 hours ago