नाशिक

कांद्याला योग्य दरासाठी ‘रास्ता रोको’

येवल्यात छावा क्रांतिवीर संघटनेतर्फे शेतकर्‍यांचे आंदोलन

येवला : प्रतिनिधी
कांद्याला मिळणारा अत्यल्प भाव आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाने कांद्याला योग्य भाव देऊन दिलासा द्यावा, या मागणीसाठी येवला शहरात छावा क्रांतिवीर संघटनेतर्फे शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
येवला शहरातील येवला-मनमाड राज्य महामार्गावर हा रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, या आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधून घेत, 2000 रुपयांपेक्षा कमी भावाने विकल्या गेलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल 1000 रुपये अनुदान देण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध केला. ‘कांदा पिकवण्यासाठी प्रतिकिलो 25 रुपये खर्च येत असताना, बाजारात मात्र उत्पादन खर्चही निघत नाही,’ अशी व्यथा आंदोलकांनी मांडली. रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. केंद्र व राज्य शासनाने शेतकर्‍यांना सहकार्य करावे, कमी भावात विकलेल्या कांद्याला 1000 रुपये क्विंटल सानुग्रह अनुदान मिळावे. मक्याच्या आधारभूत किमतीतील फरकाची 50 टक्के रक्कम तत्काळ मिळावी, 30 जून 2026 पर्यंतचे सर्व शेती कर्ज सरसकट माफ करून नवीन पीककर्ज वाटप करावे, कांदा निर्यात पूर्णपणे खुली करून व्यापार्‍यांना प्रोत्साहन द्यावे आदी मागण्या शासनाने तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी रास्ता रोको आंदोलनात करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन तहसीलदार आबा महाजन यांना देण्यात आले. दरम्यान, या आंदोलनात छावा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी इशारा दिला आहे की, जर या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर आगामी काळात यापेक्षाही तीव्र लढा उभारला जाईल. आंदोलनाला शेतकरी तसेच छावा क्रांतिवीर संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

‘Block the road’ for fair price for onions

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

8 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

15 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

21 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

27 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

32 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

47 minutes ago