नाशिक

शिवजन्मोत्सवानिमित्त येवल्यात घरोघरी भगवे ध्वज लावावे

शिवजन्मोत्सव समितीचे आवाहन; पूर्वतयारी बैठक

येवला : प्रतिनिधी
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने येवल्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेल्या ऐतिहासिक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी शिवजन्मोत्सव समितीची बैठक येवला शहरातील पाटोळेगल्लीत झाली. यंदाचे हे 91 वे वर्ष आहे.
समितीचे प्रमुख सुभाष पहिलवान पाटोळे अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला सुभाष पाटोळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. शिवजयंती उत्सवात तन आणि मनाने सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन उत्सव समिती अध्यक्ष पाटोळे यांनी केले. किशोर सोनवणे, साहेबराव सैद पाटील, सुभाष महाजन, भाजप नेते धनंजय कुलकर्णी, अ‍ॅड. समीर देशमुख, दत्ता महाले आदींनी विविध विषयांवर चर्चा केली.
येवल्यात शिवसृष्टी निर्माण झाल्याने पाटोळे गल्लीतून निघणार्‍या पारंपरिक मिरवणुकीचा मार्ग बदलण्याचा निर्णय गेल्या वर्षी सर्वानुमते घेण्यात आला होता.ऐतिहासिक शिवजयंती उत्सवाचे संस्थापक धर्मवीर गोविंदराव पाटोळे यांच्या तैलचित्र असावे. शिवकालीन विविध वेशभूषा असलेले देखावे सामील करणे, लाठीकाठी कवायतीचे डावदेखील सादर करण्याचे ठरले, असे ठराव पारित करण्यात आले. शिवजन्मोत्सवनिमित्त 19
फेब्रुवारी सकाळी शिवजन्मोत्सव मिरवणूक मार्गावर सडा-रांगोळी, भगवे ध्वज लावण्याबाबत आवाहन घरोघर जाऊन करावे. सर्व शहर व तालुकावासीयांनी या ऐतिहासिक शिवजन्मोत्सव मिरवणुकीत सहभागी होण्याचेही आवाहन केले. लेझीम आणि झांज पथकाचा समावेश असावा, गुरुवारी (दि.19) सकाळी नऊला पाटोळे गल्ली येथून ऐतिहासिक मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. प्रास्ताविकात युवराज पाटोळे यांनी शिवजयंती पारंपरिक पद्धतीने कशी साजरी केली जाते, याबाबत माहिती देऊन उत्साहात मिरवणूक पार पाडण्यासाठी विधायक सूचना केली. सचिन सोनवणे यांनी सूत्रसंचलन केले. बैठकीला सुभाष पहिलवान पाटोळे, किशोर सोनवणे, साहेबराव सैद, मधुकर सांबरे, बालूशेट परदेशी, रमाकांत भावसार, धनंजय कुलकर्णी, शैलेश देसाई, सुभाष महाजन, दत्ता महाले, चंद्रकांत कासार, सुधाकर पाटोळे, युवराज पाटोळे, पुरुषोत्तम रहाणे, सचिन सोनवणे, अनिल हलवाई, उत्तमराव घुले, धीरज परदेशी, अशोक गायकवाड, अ‍ॅड. समीर देशमुख, डॉ. महेश जोशी, दिनेश परदेशी, कृष्णा वडे, बाळासाहेब जोरी, संजय नागडेकर, विजूनाना गायकवाड, रोहित महाजन, विजय पाटोळे, संजय पाटोळे, संग्राम पाटोळे, चंपालाल उपासे, प्रवीण गवते, अरुण कोकाटे, दत्तात्रय नागडेकर, संतोष नागपुरे, मयूर कायस्थ, पृथ्वीराज पाटोळे, अतुल भावसार, चंगूदादा पाटोळे, तुषार पाटोळे, सुरेश गवते, गणेश सोनवणे, संदीप पाटोळे, हरिभाऊ नागपुरे, गणेश राऊत, सोमा घिगे, विठ्ठल माळोकर, नीलेश पाटोळे, कुलदीप पाटोळे, सोमनाथ नागपुरे, शिवराज पाटोळे, प्रकाश दगडू आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते.

On the occasion of Shiva’s birth anniversary, saffron flags should be hoisted in every house.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

1 hour ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago