सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाणे हद्दीत 2020 मध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने अटक केली आहे. अली हुसेन नुरअली शेख (वय 37, रा. संजीवनगर, अंबड लिंक रोड, नाशिक) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, तसेच सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील पाहिजे व फरार आरोपींविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी पवननगरमधील मार्केट परिसरात असल्याचे समजताच प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, पोलिस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, संजय सानप, सुनिल आहेर, वाल्मीक चव्हाण यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीस पकडले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले.अली शेख याच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तो गुन्हा घडल्यापासून फरार होता. अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, पुढील चौकशीसाठी त्याला अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. या कामगिरीसाठी गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी व अंमलदार यांचे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडून कौतुक होत आहे.
नाशिक: प्रतिनिधी तडीपार असलेल्या गुन्हेगाराचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना सिन्नर तालुक्यातील वावी शिवारात उघडकीस…
पेठ तहसील कार्यालयात आढावा बैठक नाशिक : प्रतिनिधी पेठ तालुक्यात पाणीटंचाई निवारण्यासाठी अधिकारी व कर्मचार्यांनी…
अभोणा : काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अभोण्यात सकल हिंदू समाजबांधवांतर्फे शांती मशाल ज्योत…
मनमाड ः प्र्रतिनिधी चार दिवसांपूर्वीच एक बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते, तोच एक…
केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणाचा शेतकर्यांना फटका लासलगाव ः वार्ताहर भारतातील कांदा निर्यातीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून…
पतसंस्थेतील ठेवीदारांना पैसे मिळण्याची आशा सिन्नर : प्रतिनिधी थकबाकीदारांचे पैसे वसूल करण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब…