मुंबई : प्रतिनिधी
कॉक्रोच जनता पार्टी(सीजेपी)ने शिवाजी पार्कमध्ये शुक्रवारी (दि. 2) महात्मा गांधी जयंतीदिनी ’ग्यानू, मस्ट गो’ आंदोलन पुकारले होते. यावेळी झालेल्या जाहीर सभेला संबोधित करताना अभिजीत दीपके यांनी संघावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्र्यांवरही त्यांनी प्रहार केला. संघींना वाटलं गोळी मारून गांधींना संपवू, पण तो विचार ते संपवू शकले नाहीत. गांधी कधी मरत नाहीत, असा घणाघात दीपके यांनी केला.
भारतातील लोकशाहीला अडचणीत आणणार्या ज्ञानेश कुमार यांनी मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा राजीनामा द्यावा, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी मागणी दीपके यांनी केली. दरम्यान, आंदोलन सुरू असताना त्या ठिकाणी भगवे मफलर घातलेले काही कार्यकर्ते आले आणि त्यांनी ’जय श्रीराम’च्या घोषणा देत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीजेपी कार्यकर्त्यांनी त्यांना हुसकावून लावले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन आंदोलन स्थळाहून दूर नेले.
दीपके म्हणाले की, जोपर्यंत आमच्यासारखे युवक आहेत तोपर्यंत या देशात गांधीजी जिवंत राहतील. नथुराम गोडसेसारखे हजारो येतील आणि हजारो जातील. गांधीजींच्या विचाराने हा देश पुढे चालेल. मोदी हे अजिबात गांधी, नेहरू, आंबेडकरांच्या बरोबरीचे नाहीत. गांधी देशाचा आत्मा, आंबेडकर कणा, तर नेहरू ज्ञान आहेत. पुढे कुणी महामानव येईल आणि स्वतःला नॉन बायोलॉजिकल म्हणेल. अरे, ते सांगायची गरज नाही, तुम्ही माणूस नाहीत. ते म्हणतील आम्ही विश्वगुरू आहोत. पण ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी भारताला फक्त गांधीजींचा देश म्हणूनच ओळखले जाईल..
…but Gandhi never dies!
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…