राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

रासायनिक खते धरतीमातेला मारत आहेत

पंतप्रधान मोदींचा इशारा

नवी दिल्ली : प्रतिनिधी
शेतीतल्या रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर शब्दांत चिंता व्यक्त केली आहे. शेतीतली रसायने धरती मातेला मारत आहेत, असे म्हणत त्यांनी शेतकर्‍यांना नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन केले आहे.
भारत कृषी परिषद – किसान तक कॉन्फरन्समध्ये बोलताना मोदींनी नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती यातील फरकही स्पष्ट केला. सेंद्रिय शेती म्हणजे केवळ रसायनमुक्त शेती नव्हे, तर नैसर्गिक शेती म्हणजे जमिनीची नैसर्गिक सुपीकता जपणारी, गायीच्या शेण-गोमूत्रावर आधारित, कमी खर्चाची आणि मातीतील जीवजंतू वाचवणारी शेती – असा त्यांचा संदेश होता. शेतीला स्मार्ट बनवणे, पिकांत विविधता आणणे आणि अन्नदात्याला कृषी उद्योजक बनवणे हेच विकसित भारताचे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी मोदींनी शेतकर्‍यांना दिलेल्या संरक्षणाचाही लेखाजोखा मांडला. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांचे भाव प्रचंड वाढले असताना, तो बोजा शेतकर्‍यांवर न टाकता केंद्र सरकारने आतापर्यंत सुमारे 16 लाख कोटी रुपये खत अनुदानावर खर्च केले, असे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात 3,000 रुपयांना मिळणारी युरियाची गोणी भारतीय शेतकर्‍याला 300 रुपयांपेक्षा कमी किमतीत दिली जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तरीही आता पुढचा मार्ग हा अनुदानावर अवलंबून राहण्याचा नाही, तर माती वाचवण्याचा आहे, असा मोदींचा सूर होता. शेतीचा खर्च कमी करायचा असेल आणि पुढच्या पिढीसाठी जमीन सुपीक ठेवायची असेल, तर नैसर्गिक शेती हाच पर्याय असल्याचे आवाहन त्यांनी केले.

Chemical fertilizers are killing Mother Earth.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळात बळीराजाला दिवाळी अग्रिमचा आधार

जिल्ह्यातील 4 लाख 47 हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर पाच हजार नाशिक : प्रतिनिधी अनियमित पावसामुळे खरीप…

4 hours ago

कुंभमेळ्यात 10 हजार डॉक्टर देण्याची तयारी

हनुमान चालीसा केंद्रांच्या माध्यमातून 25 कोटी लोकांपर्यंत आरोग्यसेवा : डॉ. प्रवीण तोगडिया  नाशिकरोड : विशेष…

4 hours ago

सप्तशृंगगडावर दर्शनासाठी भाविकांची महागर्दी

दीपावली सुट्टीमुळे राज्यासह परराज्यातून भाविक गडावर दाखल सप्तशृंगगड : प्रतिनिधी दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे साडेतीन शक्तिपीठांपैकी…

4 hours ago

सायबर फसवणुकीचे वाढते जाळे

आजचे युग हे डिजिटल क्रांतीचे युग म्हणून ओळखले जाते. मोबाइल, इंटरनेट, ऑनलाइन बँकिंग, डिजिटल पेमेंट…

4 hours ago

नोटबंदीच्या शक्यतेची चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा…

5 hours ago

दिवाळी संपताच सोन्याच्या दरात घसरण

ग्राहकांंची चांदी, आगामी लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी संधी नाशिक : प्रतिनिधी दीपोत्सवाचा उत्सव संपताच देशांतर्गत आणि…

5 hours ago