मंत्री महाजन : स्वच्छता अभियानाची पाहणी
नाशिक : प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पार पडलेल्या नंदिनी नदी स्वच्छता महाअभियानानंतर काल रविवारी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी नंदिनी नदी परिसरातील सुरू असलेल्या स्वच्छता व नदी संवर्धनाच्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना नदीपात्र अधिक विस्तीर्ण करण्याबरोबरच आगामी पावसाळ्यात नदीच्या प्रवाहाला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
जागतिक पर्यावरणदिनी ‘उन्नत नाशिक, स्वच्छ नाशिक, हरित नाशिक’ या संकल्पनेंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या नंदिनी नदी स्वच्छता महाअभियानात तब्बल 15 हजारांहून अधिक नाशिककरांनी सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाची भक्कम लोकचळवळ उभी केली. या अभियानाद्वारे नदी स्वच्छता, प्लास्टिक निर्मूलन, जनजागृती आणि नदी संवर्धनाचे विविध उपक्रम राबविण्यात आले होते. या अभियानानंतर नदीच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्री महाजन यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
नदीलगत असलेल्या पर्यावरणीय संपदेचे संवर्धन करण्यावरही त्यांनी भर दिला. नंदिनी नदी परिसरातील वृक्षांची योग्य निगा राखावी, त्यांचे संरक्षण करावे तसेच नदीकाठावरील हरित पट्टा अधिक मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाची मोहीम राबवावी, असे निर्देश त्यांनी दिले. नाशिककरांच्या उत्स्फूर्त सहभागातून सुरू झालेली ही पर्यावरण चळवळ आता नदी संवर्धन, जलस्रोत संरक्षण आणि हरित विकासाच्या व्यापक अभियानात रूपांतरीत होत असून, ‘स्वच्छ नदी, हरित परिसर आणि पर्यावरणपूरक भविष्य’ या संकल्पनेच्या दिशेने नाशिक आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत असल्याची भावना नाशिककरांनी व्यक्त करण्यात आली.
यावेळी पर्यावरणतज्ज्ञ राजेश पंडित, मनोज साठे, संदीप जाधव, शहराध्यक्ष सुनील केदार, नीलेश बोरा, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी
उपस्थित होते.
Clean the vessel of ‘Nandini’ before the monsoon season
- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…
- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…
- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…
- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…
- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…