लाईफस्टाइल

पावसाळ्यात कपड्यांची काळजी घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

पावसाळ्यात कपड्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. कारण दमट हवामानामुळे कपड्यांना वास येणे, बुरशी येणे किंवा रंग फिका होणे, अशा समस्या उद्भवतात. खाली दिलेल्या पाच उपयुक्त टिप्समुळे कपड्यांची योग्य देखभाल करता येईल…
ओलसर कपडे लगेच वाळत घाला ः
पावसात भिजलेले कपडे तसेच ठेवू नका. शक्य तितक्या लवकर त्यांना वाळवणे आवश्यक आहे. यामुळे बुरशी आणि वाईट वास टाळता येतो.
साबणाने नीट धुवा आणि अँटिसेप्टिक वापरा :
कपडे धुताना डेटॉलसारखे अँटिसेप्टिक द्रावण वापरा. यामुळे बॅक्टेरिया आणि दुर्गंधीपासून संरक्षण मिळते.
सूर्यप्रकाश नसल्यास घरात वाळवण्यासाठी हवेचा प्रवाह असलेली जागा निवडा.
बाहेर वार्‍याने किंवा सुसज्ज व्हेंटिलेशन असलेल्या घराच्या कोपर्‍यात कपडे वाळवा. गरज असल्यास फॅन लावा.
कपड्यांच्या नीट घड्या घाला आणि सुगंधी
नाफथलीन बॉल्स ठेवा.
कोरडे कपडे कपाटात ठेवताना कपड्यांमध्ये सुगंधी नाफथलीन बॉल्स किंवा कापर (कॅम्पर) ठेवा. हे बुरशी आणि कीटकांपासून संरक्षण करतात.
पॉलिथिनमध्ये कपडे साठवू नका :
पावसाळ्यात हवा खेळती राहणं गरजेचं असतं. त्यामुळे पॉलिथिनमध्ये कपडे
साठवल्यास बुरशी येण्याची शक्यता वाढते.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

34 minutes ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

37 minutes ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

51 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

55 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

59 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 hour ago