मंत्री गिरीश महाजनांकडून पाहणी
नाशिक : प्रतिनिधी
अंबड औद्योगिक वसाहतीलगतच्या दत्तनगर, मारुती संकुल, तुळजाभवानी परिसरासह आसपासच्या भागातील दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी (दि. 8) प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांच्या घराघरांत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणार्या उद्योगांना पाठीशी घातले जाणार नाही, दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करा आणि गरज भासल्यास त्या बंद करा, असे स्पष्ट निर्देश महाजन यांनी प्रशासनाला दिले. तसेच नागरिकांना तातडीने सुरक्षित व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
दूषित पाण्याचा वापर होऊ नये यासाठी प्रभावित भागातील हातपंप व कूपनलिका तातडीने सील करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले. तसेच नाशिक महापालिकेचे पाणी तातडीने आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याची सूचना महापालिका आयुक्तांना केली.
या प्रकरणाची माहिती देण्यासाठी महाजन यांनी उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे तसेच उद्योग, पर्यावरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रधान सचिवांसह संबंधित वरिष्ठ अधिकार्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. अंबड परिसरातील जलप्रदूषणाची वस्तुस्थिती तातडीने तपासून दोषी उद्योगांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
अंबड औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (सीईटीपी) प्रकल्पाचीही महाजन यांनी पाहणी केली. प्रकल्पाच्या कामाला होत असलेल्या विलंबाबाबत त्यांनी संबंधित अधिकारी व यंत्रणांना खडे बोल सुनावले.
नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असताना सीईटीपीसारखा अत्यावश्यक प्रकल्प रखडणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. प्रकल्पाचे काम ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करून तो कार्यान्वित करावा, अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी ठेकेदारांना दिला.
औद्योगिक सांडपाण्यामुळे भूजल तसेच पुढे नंदिनी-गोदावरी नदीप्रणालीवर परिणाम होण्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे जलप्रदूषणाचा स्रोत शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश महाजन यांनी दिले. सर्व बाबींवर संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज अहिरे, महापौर हिमगौरी आडके, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह उद्योग व पर्यावरण विभागाचे अधिकारी, महापालिका अधिकारी-कर्मचारी आणि स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.
Directives issued to take action against companies responsible for the contaminated water issue in Dattanagar.
तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…
पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…
नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…
चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…
आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…