आ. रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप
नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या बाह्य रिंगरोड आणि एमआयडीसीसाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात बाधित शेतकर्यांनी मंगळवारी (दि. 26) रामकुंड येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व आमदार रोहित पवार यांनी भेट देत शेतकर्यांना पाठिंबा दर्शविला.
आ. रोहित पवार यांनी, बाह्य रिंगरोड प्रकल्पाच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. रिंगरोडमुळे सुमारे 25 गावे प्रभावित होत असताना स्थानिकांंना विश्वासात घेतले गेले नसल्याचा आरोप त्यांनी केला. विकास आराखड्यातील रस्त्यांना विरोध नसला, तरी काही प्रभावशाली बिल्डर्स आणि राजकीय नेत्यांच्या हितासाठी रिंगरोडचा मार्ग बदलण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे अनेक शेतकर्यांच्या सुपीक जमिनी बाधित होत असल्याचे ते म्हणाले.
भूसंपादनासाठी निश्चित करण्यात आलेल्या रेडीरेकनर दरांवरही त्यांनी आक्षेप घेत शेतकर्यांना बाजारभावानुसार योग्य मोबदला देण्याची मागणी केली. शेतकर्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी दबावाचे तंत्र वापरण्यात आले तर आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असा इशाराही त्यांनी दिला.
आ. पवार यांनी नाशिक महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमआयडीसीच्या कामकाजावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आगामी कुंभमेळ्याच्या विकासकामांत अनियमितता झाल्याचा दावा केला. 2 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील माहिती सार्वजनिक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनीही शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. महाविकास आघाडी शेतकर्यांच्या प्रश्नांंवर ठामपणे लढा देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Farmers’ indefinite hunger strike against outer ring road land acquisition
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…