नाशिक

निफाडला 39 लाखांचा अन्नसाठा जप्त

नाशिक : प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने भेसळयुक्त पदार्थाची विक्री करणार्‍याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. निफाड तालुक्यात 39 लाख 18 हजार 520 रुपये किमतीचा एकूण 6,457 किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने विशेष मोहीम राबवत भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे. निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील आर्या कोल्ड स्टोअरेज अ‍ॅण्ड एक्स्पोर्टवर कारवाई केली. तपासणीदरम्यान 39 लाख 18 हजार 520 रुपयांचा एकूण 6,457 किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला. यात 2,996 किलो फ्रोजन कस्टर्ड पल पल्प, 1,780 किलो आंबा पल्प आणि 1,681 किलो क्रीमचा समावेश आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेे यांच्या मार्गदर्शनाखाली 9 सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. संबंधित अन्नपदार्थ मिथ्याछाप तसेच कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून त्यांचा साठा ताब्यात घेण्यात आला. तपासणीवेळी अन्नपदार्थांच्या लेबलवर वापरण्याची अंतिम तारीख, पोषणमूल्याची माहिती, पॅकिंगची तारीख आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचा परवाना क्रमांक नमूद नसल्याचे आढळले.
जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्नपदार्थांचा दर्जा निश्चित होऊन त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सुहास मंडलिक आणि अमित रासकर यांनी सहायक आयुक्त अन्न दिनेश तांबोळी आणि सहआयुक्त अन्न मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

Food stock worth ₹39 lakh seized in Niphad

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिहस्थ सोहळ्यासाठी नाशिकमध्ये कडेकोट बंदोबस्त

तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…

4 days ago

झाडे तोडली तर पाखरांनी परत जायचे कुठे?

पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…

4 days ago

सत्ताधार्‍यांना धक्के

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…

4 days ago

कुंभमेळ्याच्या जागेसाठी शासनाने ठोस भुमिका घ्यावी

नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…

4 days ago

ध्वजारोहणासाठी शहर भगवेमय

चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…

4 days ago

फिरायला जाताय, एनसीएमसी कार्ड नोंदणी केली का?

आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…

4 days ago