नाशिक

काश्यपी धरणात बुडून चौघांचा मृत्यू

काश्यपी धरणात बुडून चौघांचा मृत्यू

नाशिक: प्रतिनिधी

काश्यपी धरणात बुडून पती-पत्नी सह दोघा भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. यात पत्नी ही सहा ते सात महिन्याची गर्भवती होती.

हरसूल हद्दीत असलेल्या काश्यपी धरण परिसरात पर्यटनासाठी सचिन कैलास ठोंबरे, वय अंदाजे 30 वर्षे, सध्या राहणार मखमलाबाद, मूळ राहणार, पिंपरणे, ता. संगमनेर, रोहिणी सचिन ठोंबरे, वय  25 वर्षे आणि घरा शेजारी राहणारे केतन अनिल पवार, वय 16 वर्षे, रा. मखमलाबाद,  कौशल अनिल पवार, वय 14 वर्षे, हे गेले होते. अंघोळीसाठी सर्व जण पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वजण   बुडाले. पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना समजताच रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. सर्व मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवले. मृत रोहिणी ही सहा ते सात महिन्याची गर्भवती होती. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

 

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

15 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

15 hours ago