कचरा नगर परिषदेत आणून टाकण्याचा शिवसेना उबाठाचा इशारा
चांदवड : वार्ताहर
शहरातील वाढती अस्वच्छता, कचरा संकलन करणार्या घंटागाड्यांची अनियमितता आणि तुंबलेल्या गटारींच्या प्रश्नावर शिवसेना (उबाठा) पक्ष आक्रमक झाला आहे. शहरातील स्वच्छता व्यवस्था तातडीने सुरळीत करण्याच्या मागणीसाठी पक्षाच्या पदाधिकार्यांनी चांदवड नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना निवेदन दिले.
नगर परिषदेच्या चुकीच्या नियोजनामुळे कचरा संकलन करणार्या घंटागाड्या अनेक दिवसांपासून नियमितपणे शहरात येत नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. परिणामी नागरिकांच्या घरांमध्ये तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून, दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील अनेक भागांतील गटारी तुंब‘लेल्या असून त्यांची वेळेवर स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
कचरा आणि तुंबलेल्या गटारींमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याचा दावा शिवसेना उबाठाच्या पदाधिकार्यांनी केला. गणेशोत्सव जवळ आलेला असल्याने त्यापूर्वी शहरातील स्वच्छता व्यवस्था प्रभावीपणे राबविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी प्राथमिक स्वरूपात कचर्याने भरलेला डस्टबिन नगरपरिषदेचे स्वच्छता अभियंता सोनवणे यांच्याकडे देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. घंटागाड्या नियमित सुरू करणे, तुंबलेल्या गटारींची स्वच्छता करणे तसेच शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.निवेदन देताना शिवसेना शहरप्रमुख प्रसादभाऊ प्रजापत, शहर संघटक सचिन (गुड्डू) खैरनार, शहर समन्वयक सुरेश सोनवणे, उपशहरप्रमुख शंभूराजे खैरे, उपशहरप्रमुख धीरज संकलेचा, उपशहरप्रमुख तोफिकभाई शेख, वाहतूक सेना तालुकाध्यक्ष अकबरभाई पठाण, वसीमभाई, युवासेना शहरप्रमुख रुपेश बागूल, नामदेवराव विसपुते, रिजवान घासी आदी उपस्थित होते.
स्वच्छता कर माफ करण्याची मागणी
नगर परिषदेकडून घरपट्टी व नळपट्टी नियमित न भरल्यास नागरिकांकडून शास्ती व दंडाची वसुली केली जाते. मात्र, नागरिकांना अपेक्षित असलेली स्वच्छता सेवा नियमितपणे मिळत नसल्याचे सांगत चालू वर्षाच्या घरपट्टीमधील स्वच्छता कर माफ करण्यात यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत नगर परिषदेने तुंबलेल्या गटारींची स्वच्छता, नियमित कचरा संकलनासाठी घंटागाड्यांची व्यवस्था आणि शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उबाठाने दिला आहे. शहरातील घरोघरी जमा झालेला कचरा ट्रॅक्टरमध्ये संकलित करून वाजतगाजत नगरपरिषदेच्या आवारात आणून टाकण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
Garbage collection vehicle service stopped in Chandwad; drains clogged.
तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…
पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…
नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…
चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…
आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…