हरणबारी व केळझर 100 टक्के भरले; नागरिकांचे स्थलांतर
मालेगाव : प्रतिनिधी
जुलैअखेर झालेल्या मुसळधार पावसामुळे मालेगाव शहरासह कसमादे परिसरातील नद्या, धरणे आणि पाणीपुरवठा योजनांना मोठा दिलासा मिळाला आहे. गिरणा व हरणबारी धरणे ओव्हरफ्लो झाल्याने गिरणा व मोसम नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणांतून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
शेतकरी, योजनांना दिलासा
जूनमध्ये लांबलेल्या पावसाने जुलैच्या दुसर्या आठवड्यापासून जोरदार हजेरी लावली. चणकापूर, पुनद व हरणबारी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना मोठे पूर आले आहेत. गिरणा डाव्या कालव्याद्वारे विविध जलसाठे भरले जात असून, परिसरातील तलाव, पाझर तलाव व पाणीपुरवठा योजना तुडुंब भरल्या आहेत. या सातत्यपूर्ण पावसामुळे खरीप पिकांना संजीवनी मिळाली असून, शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
25 ते 30 घरांत शिरले पुराचे पाणी
हरणबारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे मोसम नदीला यंदाच्या हंगामात दुसर्यांदा मोठा पूर आला. शुक्रवारी मध्यरात्री नदीत सुमारे 10,500 क्यूसेक पाण्याची आवक झाल्याने सखल भागातील 25 ते 30 घरांत पाणी शिरले.
अग्निशमन विभागाने किल्ला झोपडपट्टी, इस्लामाबाद, गालीबनगर, सर्व्हे क्र. 55 व कॅम्प परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले. गालीबनगरमधील नागरिकांची महापालिका शाळा क्रमांक 8 मध्ये, तर किल्ला झोपडपट्टीतील नागरिकांची स्थानिक मदरशात तात्पुरती सोय करण्यात आली
आहे.
धरणांमधील सद्य:स्थिती
हरणबारी धरण : 100 टक्के भरले (क्षमता : 33.02 दशलक्ष
घनमीटर). सांडव्याद्वारे 2,104 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू.
केळझर धरण: 100 टक्के भरले (क्षमता : 16.22 दशलक्ष
घनमीटर). सांडव्याद्वारे 1,100 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू
चणकापूर धरण : 81.46 टक्के साठा (उपयुक्त साठा : 55.99
दशलक्ष घनमीटर). 3,253 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.
Girna Duthadi, Mosam river floods for the second time
- प्रशांत पोतदार ‘नारायणाच्या पोटात सुमेरसिंगाची तलवार, ’काका, मला वाचवा!’ असा झाला आक्रोश फार.’ इतिहासात…
- अशोक थोरात देशात अनेक संकटे आहेत पुर्वी बाहेरगावी निरोप कसा द्यावा खुप अडचणी येत…
- देवयानी सोनार नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी जिल्हा परिषदेचा कारभार…
- मुकुंद बाविस्कर नाशिक जिल्ह्यात सिंहस्थ कुंभमेळा सन 2027 च्या पार्श्वभूमीवर सुमारे 12 कोटींहून अधिक…
- गोरख काळे नाशिकमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाडा सुखावला असून, जायकवाडीतील पाणीपातळी सत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचली…
- जगन घाणेकर वेळेचे आणि ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन म्हणजेच आयुष्याचे यश! आजच्या तरुण पिढीला आयुष्यात…