हिंस्र असल्याचा वन विभागाचा दावा; ग्रामस्थ मात्र साशंक
सिन्नर : प्रतिनिधी
पंचाळे आणि निमगाव देवपूर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात दोन बालकांचा बळी गेल्यानंतर अथक प्रयत्नांती शुक्रवारी (दि.19) रात्री 9 वाजता बिबट्याच्या मादीला रेस्क्यू करण्यात वनविभागाला यश आले. पंचाळे- देवपूर रस्त्यावर हॉटेल साई तरंगच्या पाठीमागे हे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. पकडलेली बिबट्याची मादी हीच नरभक्षक असल्याचा दावा वनविभागाच्या अधिकार्यांनी केला आहे.
अर्धवट खालेल्या कुत्र्याची शिकार पुन्हा करण्यासाठी बिबट्या मक्याच्या शेतातून बाहेर येताच दबा धरून बसलेल्या वनविभागाच्या पथकाने ट्रँक्युलायझर गनच्या साह्याने शूट करत बिबट्याला बेशुद्ध केले. त्यानंतर त्यास तातडीने पिंजर्यात टाकून नाशिक टीटीसी येथे रवाना केले. देवपूर – पंचाळे रोडवरील हॉटेल साई तरंगच्या पाठीमागे नवनाथ जाधव यांचे शेतात बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचे थर्मल ड्रोन मध्ये कैद झाले होते. याशिवाय शिकार केलेल्या कुत्र्याचे अर्धवट शरीर मकाच्या शेतातच पडून होते. वन विभागाच्या पथकाने अर्धवट खाल्लेला कुत्रा फरफटत बाहेर आणून खुंटीला बांधून ठेवत बिबट्या येण्याची वाट बघितली. तोपर्यंत संपूर्ण नैसर्गिक अधिवासात वनविभागाचे पथक क्रमांक 3 दबा धरून बसले होती. रात्री नऊ वाजेच्या सुमारास बिबट्या अर्धवट खाल्लेला कुत्रा खाण्यासाठी आल्यानंतर वनविभागाच्या पथकाने अचूक नेम साधत मोहीम फत्ते केली. नाशिक पश्चिम विभागाचे उप वनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक कल्पना वाघेरे, सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर, वनपाल तानाजी भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली
बोरीवली नॅशनल पार्क, निफाड रेस्क्यू टीम, नाशिक टीटीसी सेंटर, संभाजी नगर रेस्क्यु पथक, इगतपुरी, पेठ, हर्सूल आणि सिन्नर वनविभागाचे कर्मचारी यांनी मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
नागरिक मात्र साशंक
दरम्यान, खडांगळी, निमगाव देवपूर, पंचाळे, धनगरवाडी आणि मेंढी, शिवारात अनेक बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हिंस्त्र बिबट्याची मादी हल्लेखोर हिस्नरभक्षक की अन्य याबाबत मात्र वनविभागाने अधिकृत माहिती दिली नाही. नागरिकांमध्येही याबाबत साशंकता आहे.
लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…
ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…
नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…
कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…
पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…
अन्यथा अधिकार्यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…