नाशिक : प्रतिनिधी
परंपरेनुसार फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला होळी साजरी करण्यात येते. होळीच्या दिवशी होलिका दहन करत वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टी आत्मसात करत नवीन सुरुवात करण्यात आली. ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’ म्हणत शहरात उत्साहात होळीचा सण साजरा  करण्यात आला.
संध्याकाळच्या वेळी होळी पेटवत होलिकेला  पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. तसेच होळीत नारळाची आहुती देण्यात आली. होळीत भाजल्यानंतर खोबर्‍याचा प्रसाद वाटप करण्यात आला.   होळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याचीही प्रथा आहे.  शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक होळी पेटविण्यात आली. संस्था, संघटनांसह सोसायटीतील नागरिकांनी एकत्र येत होलिकोत्सव साजरा केला. शहरातील सर्वच भागात होळीचा सण साजरा करण्यात आला. आज धुळवड आहे. मात्र, नाशिक शहरात परंपरागत रंगपंचमी साजरी करण्यात येते. मात्र अनेक जण होळीची राख अंगाला लावत धुळवड साजरी करतात. मराठी वर्षातला शेवटचा सण असल्याने होळी सणाला विशेष महत्त्व आहे.

Team Gavkari

Recent Posts

मृतदेह बोलत नसतो, पण पोस्टमार्टम सत्य सांगते!

- अफजल पठाण श्वास थांबला म्हणून कहाणी संपत नाही, कधीकधी मृत्यूच्या शांत देहातूनच सत्य बोलतं...…

13 hours ago

यिन-यांग

- वासवदत्ता अग्निहोत्री पहिले बीज की त्या आधी रोप? आधी कोंबडी की आधी अंडी? हे…

14 hours ago

समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी, नवीन सौरतंत्रज्ञान

- डॉ. किशोर पवार जगातील वाढती लोकसंख्या, हवामानबदल आणि पाण्याच्या असमान उपलब्धतेमुळे गोड्या पाण्याची समस्या…

14 hours ago

डिजिटल दरोडा!

- सीमाताई मराठे ‘40 पैसे दिल्याने कोणाचा जीव जात नाही...’ निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या मुखातून बाहेर…

14 hours ago

भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत नवी भरारी

आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताची कामगिरी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित खेळांमध्ये…

14 hours ago

युद्ध थांबल्याचं तुणतुणं

युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन-युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यावर्षीच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह…

14 hours ago