नाशिक

वडझिरे गोळीबार प्रकरणी दोघांना जन्मठेप

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावावर झाडली होती गोळी

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील वडझिरे परिसरात साडेपाच वर्षांपूर्वी झालेल्या देवीदास कुटे यांच्या खून प्रकरणी नाशिकरोड येथील सत्र न्यायालयाने मयताचा सख्खा भाऊ गणेश नामदेव कुटे (28) आणि त्याचा साथीदार प्रवीण शंकर वाकचौरे (28) यांना दोषी ठरवत प्रत्येकी आजन्म कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिन्यांचा सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.
या घटनेत आरोपी गणेश नामदेव कुटे याने एका साथीदाराला सोबत घेत जमिनीच्या वादातून आपला सख्खा भाऊ देवीदास नामदेव कुटे यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडून त्यांचा खून केला होता. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश केदार जोशी यांच्या न्यायालयात गुरुवारी (9 एप्रिल) या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला. या घटनेसंदर्भात एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 306/2020 नोंदवण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांनी केला. नाशिक सत्र न्यायालयात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. सुलभा सांगळे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे न्यायालयाने दोन्ही आरोपींना भारतीय दंड विधान कलम 302, 34 तसेच शस्त्र कायद्यान्वये दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या निकालामुळे सिन्नर तालुक्यातील गाजलेल्या खूनप्रकरणाला अखेर सहा वर्षांनंतर न्यायालयीन पूर्णविराम मिळाला. मुसळगाव एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, हवालदार भगवान शिंदे यांच्यासह कर्मचार्‍यांनी या कामी महत्त्वाची भूमिका निभावली.

अशी घडली होती घटना

6 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री सुमारे 11.30 वाजता वडझिरे शिवारात ही घटना घडली होती. फिर्यादी सरिता देवीदास कुटे (रा. वडझिरे, ता. सिन्नर) यांचे पती देवीदास नामदेव कुटे यांचा त्यांच्या सख्ख्या भावासोबत शेती विक्रीच्या कारणावरून वाद सुरू होता. त्या रात्री आरोपी प्रवीण वाकचौरे याने देवीदास कुटे यांना घराबाहेर बोलावले. सोमनाथ गिते यांच्या पोल्ट्रीचे पिल्ले आली आहेत, त्यांचा फोन नंबर घ्यायचा आहे, असा बहाणा करून त्यांना बाहेर नेण्यात आले. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून पिस्तुलातून गोळ्या झाडत देवीदास कुटे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. डाव्या डोळ्याजवळ, उजव्या मांडीवर आणि डाव्या बरगडीवर गोळ्या लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

1 hour ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago