नाशिक

इराणला साथ द्यायला हवी

राज ठाकरे : तरुणांना मोबाइलमध्ये गुंतवून ठेवण्याचा डाव

मुंंबई :
महाराष्ट्राचे गतवैभव मिळवण्यासाठी, भविष्यात सत्ता घेणार हा माझा आत्मविश्वास आहे. राज ठाकरे यांनी इराण- इस्रायल युद्धावरही प्रतिक्रिया दिली. इराण इतकी वर्षे आपल्याला साथ देत होता, त्या इराणवर हल्ले होत असताना आपण इराणला साथ द्यायला हवी होती, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. भविष्यात याचा फटका बसणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
यंदाही दादरच्या ऐतिहासिक शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भव्य गुढीपाडवा मेळावा उत्साहात पार पडला. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे यांची ही पहिलीच मोठी जाहीर सभा असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागले होते. अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे यांनी खास शैलीत सद्य:स्थितीवर भाष्य करत राज्यातील तरुणाईला वास्तवाची जाणीव करून दिली.
राज ठाकरे यांनी राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर बोट ठेवले. ते म्हणाले की, आज महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. संपूर्ण राज्य कर्जाच्या विळख्यात अडकले आहे. तुम्ही राज्यातील कोणत्याही शहरात जा, तिथे ना कसला आकार उरला आहे, ना उकार आहे. शहरांची दुरवस्था झाली आहे.
माध्यमांवरही दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, बातम्या दाखवू नयेत, यासाठी दबाव टाकला जातो आणि पत्रकारांना नोकरीवरून काढण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे नागरिकांपर्यंत खरी माहिती पोहोचत नाही. राज्याच्या आर्थिक स्थितीवर बोलताना त्यांनी सांगितले की, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यावर सुमारे 2 लाख कोटींचे कर्ज होते, ते आता वाढून 11 लाख कोटींवर पोहोचले आहे. ‘विकासा’च्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी शहरांमधील वाढते ट्रॅफिक, अतिक्रमणांनी भरलेले फुटपाथ आणि कमी होत चाललेली मैदाने याकडे लक्ष वेधले.
आम्ही फक्त मोबाइलवर व्यक्त होतोय!
राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर बोलताना राज ठाकरेंनी तरुणांच्या मानसिकतेवर प्रहार केला. ते म्हणाले की, राज्यात शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे, परिस्थिती गंभीर आहे. परंतु, आपण हे सर्व फक्त पाहतोय आणि केवळ मोबाईलवर व्यक्त होतोय. आपण व्हर्च्युअल जगात अडकलो आहोत. मैदानात उतरून संघर्ष करण्याऐवजी तरुण पिढी केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित राहिल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तरुणांचे कान टोचले.

iran-should-be-supported

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…

13 hours ago

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

13 hours ago

साखर कारखानदारीची घरघर थांबणार कधी?

- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…

13 hours ago

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

13 hours ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

13 hours ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

13 hours ago