नाशिक

टीसीएस प्रकरणातील पीडितांना न्याय मिळवून द्यावा

‘अभाविप’चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने’

नाशिक : प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) नाशिक महानगरतर्फे टीसीएस-नाशिक येथे घडलेल्या महिलांशी संबंधित गंभीर प्रकरणाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी (दि. 22) आंदोलन करण्यात आले. यात मोठ्या संख्येने विद्यार्थी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी महिला कर्मचार्‍यांवरील कथित लैंगिक छळ, मानसिक त्रास आणि दबावाच्या प्रकारांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
‘अभाविप’ने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या घटनेमुळे समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली असून, कॉर्पोरेट क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पीडितांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
महिलांना कॉर्पोरेट क्षेत्रात सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे, हा मुद्दा आंदोलनकर्त्यांनी ठामपणे मांडला. अशा घटनांमुळे महिलांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी ‘अभाविप’च्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री मेघा शिरगावे यांनी सांगितले की, नामांकित कंपनीत जर एखाद्या युवतीची फसवणूक, भावनिक छळ, धमक्या किंवा जबरदस्तीचे प्रकार घडत असतील तर ते अत्यंत गंभीर आहे. विश्वासाच्या नात्याचा गैरवापर करून केलेली फसवणूक ही समाजासाठी धोकादायक आहे. अशा प्रकरणांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी
स्पष्ट केले.
या आंदोलनात महानगर मंत्री व्यंकटेश अवसरकर, सहमंत्री योगेश महाजन, तसेच सार्थक आढाव, देवेंद्र देशमुख, मृणाल देव, अक्षदा कालेकर, क्षितिजा बुराडे, प्रांजल ढोकणे, आदिती आढाव, विजया नरवाडे, शताक्षी नागरे आदी उपस्थित होते.

Justice should be given to the victims of the TCS case.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डाळिंबबागेने नेसला ‘पांढरा शालू’

सिन्नर : प्रतिनिधी एप्रिल महिन्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने सिन्नर तालुक्यातील तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले…

3 days ago

शासकीय जमिनीवरील घरे होणार अधिकृत

निफाड उपविभागीय अधिकार्‍यांचे नगरपालिकांना आदेश सिन्नर : प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, ओझर, सिन्नर आणि…

3 days ago

आदिवासी भागातील डोंगरदर्‍यांत बहरताहेत करवंदे

इगतपुरी तालुक्यात आदिवासी बांधवांना मिळतोय रोजगार इगतपुरी : प्रतिनिधी तालुक्यातील डोंगरदर्‍या परिसरातील आदिवासी भागातील “डोंगरची…

3 days ago

बिबट्याने वर्षभरात 6 बळी घेऊनही वन विभाग सुस्त

ग्रामस्थांचा संताप; बिबट्याच्या संख्येत झपाट्याने वाढ दिंडोरी : अशोक केंग तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांनी नागरिक दहशतीखाली…

3 days ago

दैवी शक्तीच्या नावाखाली महिलेचे लैंगिक शोषण

भोंदूबाबावर गुन्हा दाखल निफाड /लासलगाव : वार्ताहर घरगुती ताणतणाव, वैवाहिक अडचणी आणि मानसिक अस्वस्थतेचा गैरफायदा…

3 days ago

पंचायत राज : तळागाळातील लोकशाहीचा पाया

भारतीय संस्कृतीच्या पायाभूत रचनेत ‘ग्राम’ ही संकल्पना केंद्रस्थानी आहे. प्राचीन काळापासून गाव हे सामाजिक, आर्थिक…

3 days ago