नाशिक

पिंजर्‍यातील कुत्र्यावर बिबट्याची झडप

सीसीटीव्हीत थरार कैद

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड परिसरातील चेहेडी बुद्रुक येथील शेतकरी शिवाजीराव म्हस्के यांच्या शेतमळ्यात शनिवारी मध्यरात्री बिबट्याने पिंजर्‍यात बंद असलेल्या कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बिबट्याच्या या हालचाली सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाल्याने परिसरात
खळबळ उडाली.
शनिवारी सायंकाळी शिवाजीराव म्हस्के यांचे बंधू श्यामराव म्हस्के हे पत्नी व मुलासह कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते घरी परतल्यानंतर काही वेळातच पिंजर्‍यातील कुत्रा जोरजोरात भुंकू लागला. बाहेर नेमके काय घडले आहे, हे पाहण्यासाठी कुटुंबीयांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बंगल्याच्या परिसरात बिबट्या फिरताना
दिसून आला.
पिंजर्‍यातील कुत्र्याला पकडण्यासाठी बिबट्या वारंवार पिंजर्‍याजवळ झडप घालत होता. मात्र, पिंजरा बंद असल्याने त्याला कुत्र्यापर्यंत पोहोचता आले नाही. कुत्र्याचा आवाज वाढल्यानंतर म्हस्के कुटुंबीयांनी बंगल्याच्या चारही बाजूंचे दिवे लावले. प्रकाशझोतात बिबट्या येताच त्याने क्षणाचाही विलंब न करता बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या मक्याच्या शेतात धूम ठोकली. दरम्यान, या घटनेच्या सुमारे एक ते दीड तास आधी चाडेगाव शिवारातही बिबट्या दिसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चाडेगावकडून चेहेडी बुद्रुकच्या दिशेने बिबट्याने मार्गक्रमण केले असावे, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्याने थेट घराच्या तिसर्‍या मजल्यावर जाऊन कुत्र्याची शिकार केली होती. या घटनेनंतर वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावला आहे. आता शेतमळ्यातील पिंजर्‍यात बंद असलेल्या कुत्र्यावरही बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती वनाधिकारी सुमित निर्मळ यांना देण्यात आली असून, वनविभागाकडून परिसरातील बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. चाडेगाव, चेहेडी बुद्रुक तसेच लगतच्या शेतमळ्यांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने रात्रीच्या वेळी शेतकर्‍यांनी अधिक खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leopard attacks a caged dog

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

भूमि अभिलेखचा उपअधीक्षक पाचशे रुपयांची लाच घेताना जाळ्यात

  भूमि अभिलेखचा उपअधीक्षक पाचशे रुपयांची लाच घेताना जाळ्यात सटाणा:  प्रतिनिधी वारसाहक्काने मिळालेल्या घराची नोंद…

26 minutes ago

सिहस्थ सोहळ्यासाठी नाशिकमध्ये कडेकोट बंदोबस्त

तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…

4 days ago

झाडे तोडली तर पाखरांनी परत जायचे कुठे?

पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…

4 days ago

सत्ताधार्‍यांना धक्के

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…

4 days ago

कुंभमेळ्याच्या जागेसाठी शासनाने ठोस भुमिका घ्यावी

नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…

4 days ago

ध्वजारोहणासाठी शहर भगवेमय

चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…

4 days ago