12 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
सिडको : प्रतिनिधी
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करणारा आयशर ट्रक एमआयडीसी पोलिसांनी गरवारे पॉइंट परिसरात पकडला.
या कारवाईत विविध कंपन्यांचा पानमसाला व तंबाखू तसेच आयशर ट्रक असा एकूण 12 लाख 85 हजार 662 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गरवारे पॉइंट, अंबड, नाशिक येथे करण्यात आली. पोलिसांनी चेतन दत्तात्रय पोमण (वय 34, रा. सारूळा, ता. भोर, जि. पुणे) याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात वसीमाण पठाण (रा. मुंबई) याचाही आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. पोमण हा आयशर ट्रक (एमएच 17 एजी 9359) मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थ घेऊन जात होता. हे पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगून वाहतूक करत असताना पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात विमल पानमसाल्याचे 315 पुडे, व्ही-1 बिग तंबाखूचे 315 पुडे, राजश्री पानमसाल्याचे 208 पुडे, तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश आहे. या पदार्थांची एकूण किंमत 2 लाख 85 हजार 662 रुपये असून, सुमारे 10 लाख रुपये किमतीचा आयशर ट्रकही जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Truck transporting banned gutkha and tobacco seized.
राजधानी दिल्लीतील गणेशोत्सवानिमित्त सोमवार(आज)पासून महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती, संगीत, नाट्य आणि लोकपरंपरांचे दर्शन घडविणार्या कार्यक्रमांची…
पार्वतीच्या बाळा पायात वाळा पार्वतीच्या बाळा पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा ताशाचा आवाज तारारारा झाला…
सीसीटीव्हीत थरार कैद नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी नाशिकरोड परिसरातील चेहेडी बुद्रुक येथील शेतकरी शिवाजीराव म्हस्के…
जिल्ह्यातील वाहतुकीवर परिणाम नाशिक : प्रतिनिधी गौरी-गणपती उत्सवानिमित्त कोकणात जाणार्या चाकरमान्यांच्या वाहतुकीसाठी नाशिक एसटी विभागातील…
सुरक्षेची उपाययोजनाही केलेली, सीसीटीव्ही तपासणार नाशिक : प्रतिनिधी सिद्धार्थनगर येथे घडलेली अपघाताची घटना दुर्दैवी आहे…
मनपासमोर मृतदेह ठेवून संतप्त नातेवाइकांचे आंदोलन नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये रस्ते अपघाताची मालिका सुरूच असून,…