राष्ट्रीय पोषण सप्ताह हा भारतभर
1 ते 7 सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जातो. 1982 मध्ये फूड अँड न्यूट्रिशन बोर्डद्वारे सुरू करण्यात आलेली ही वार्षिक जनजागृती मोहीम आहारातील विविधता, संतुलित पोषण आणि आरोग्यदायी आहाराच्या सवयींबाबत जनजागृती करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. 2026 ची अधिकृत थीम “डिस्कवर द पावर ऑफ न्यूट्रिशन” “पोषणाची शक्ती जाणून घेऊया” ही दैनंदिन जीवनातील साध्या आणि सजग आहाराच्या निवडींमुळे दीर्घकालीन जीवनशैलीशी संबंधित आजार टाळणे, रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणे आणि एकूण आरोग्य व जीवनमान सुधारण्यावर भर देते.
पोषण म्हणजे केवळ भूक भागविणे किंवा कॅलरीचे गणित नव्हे; पोषण म्हणजे शरीराच्या प्रत्येक पेशीला योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य दर्जाचे पोषक घटक उपलब्ध करून देणे. शरीराची वाढ, ऊर्जा निर्मिती, चयापचय, रोगप्रतिकारशक्ती, मेंदूचे कार्य, हार्मोनल संतुलन आणि ऊतकांची दुरुस्ती या सर्व प्रक्रियांमध्ये पोषणाची मूलभूत भूमिका आहे.
आजच्या बदलत्या जीवनशैलीत पोषणाचे महत्त्व अधिक वाढले आहे. अति-प्रक्रिया केलेले पदार्थ, अतिरिक्त साखर आणि मीठ, कमी तंतुमय पदार्थ, अपुरा प्रथिनांचा आहार, अनियमित जेवण आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका वाढत आहे.
एक डायटिशियन म्हणून माझ्या मते, “हेल्दी इटिंग” म्हणजे कठोर डाएट किंवा अन्नपदार्थांवर अनावश्यक निर्बंध नव्हेत. संतुलित, विविधतापूर्ण, स्थानिक आणि ऋतूनुसार उपलब्ध अन्नपदार्थांचा योग्य प्रमाणात समावेश करणे हे शाश्वत आरोग्याचे रहस्य आहे. आपल्या ताटात पुरेसे प्रथिने, संपूर्ण धान्य, डाळी-कडधान्ये, भाज्या, फळे, दूध किंवा पर्यायी स्रोत, सुका मेवा-बिया आणि आरोग्यदायी चरबी यांचा समतोल असणे आवश्यक आहे.
विशेषतः बालपण आणि किशोरावस्था हा शारीरिक व मानसिक विकासाचा महत्त्वाचा काळ आहे. या काळातील योग्य पोषण केवळ निरोगी वाढीसाठीच नव्हे, तर भविष्यातील आरोग्याची पायाभरणी करण्यासाठीही आवश्यक आहे. त्यामुळे मुलांना पोषण शिक्षण देणे, पौष्टिक घरगुती आहाराची सवय लावणे आणि नियमित शारीरिक सक्रियतेला प्रोत्साहन देणे ही पालक, शाळा आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.
त्याचप्रमाणे प्रौढ आणि ज्येष्ठ व्यक्तींमध्ये वय, शारीरिक सक्रियता, शरीररचना आणि वैद्यकीय गरजांनुसार वैयक्तिकृत पोषण महत्त्वाचे ठरते. प्रत्येक व्यक्तीची पोषणाची गरज वेगळी असल्याने “एकच आहार सर्वांसाठी” ही संकल्पना योग्य नाही.
आज सोशल मीडियावर विविध डाएट ट्रेंड्स आणि पोषणविषयक माहिती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. मात्र, प्रत्येक सल्ला वैज्ञानिकदृष्ट्या योग्य असेलच असे नाही. त्यामुळे इव्हिडन्स बेस्ट न्यूट्रिशन स्वीकारणे आणि आवश्यकतेनुसार क्वालिफाइड डायटेशन किंवा न्यूट्रिशनिस्ट यांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
या राष्ट्रीय पोषण सप्ताह 2026 मध्ये आपण पोषणाकडे केवळ वजन कमी करण्याच्या दृष्टिकोनातून न पाहता, रोगप्रतिबंध, निरोगी वाढ, कार्यक्षमता, मानसिक स्वास्थ्य आणि हेल्दी एजिंग यांचा आधार म्हणून पाहूया.
आपल्या ताटातील प्रत्येक निवड ही आपल्या भविष्यातील आरोग्यातील
गुंतवणूक आहे.
Let us discover the power of nutrition.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…