महाराष्ट्र

शेतकर्‍यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी

मुख्यमंत्री : ‘सिबिल स्कोअर’ची आवश्यकता नाही

मुंबई : प्रतिनिधी
आगामी खरीप हंगामासाठी अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या 30 जूनपर्यंत सर्व पात्र शेतकर्‍यांच्या खात्यावर कर्जमाफीचा थेट लाभ दिला जाईल. तसेच शेती कर्जासाठी शेतकर्‍यांकडे ‘सिबिल स्कोअर’ची सक्ती केली जाणार नाही, अशी महत्त्वपूर्ण आणि मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकर्‍यांना पीककर्ज मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. खरीप हंगाम नियोजनाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी बँकांना याबाबतचे थेट आणि कडक निर्देश दिले असून, नियमांचे उल्लंघन करणार्‍या बँकांवर कडक कारवाईचा इशाराही
दिला आहे.
अनेक बँका शेतकर्‍यांना पीककर्ज नाकारण्यासाठी किंवा प्रक्रियेत अडथळे आणण्यासाठी ‘सिबिल स्कोअर’चा निकष लावत असल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर, सरकारने बँकांची ही सक्ती पूर्णपणे बेकायदेशीर ठरवली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, शेती कर्ज हा शेतकर्‍यांचा हक्क आहे. बँका कोणत्याही शेतकर्‍याला सिबिल स्कोअर कमी आहे, या कारणास्तव कर्ज नाकारू शकत नाहीत. सर्व बँकांनी चालू खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना तातडीने आणि कोणत्याही जाचक अटींशिवाय पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
राज्यातील प्रलंबित शेती कर्जमाफीची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण केली जात असून, येत्या 30 जूनपर्यंत सर्व पात्र शेतकर्‍यांच्या खात्यावर कर्जमाफीचा लाभ थेट हस्तांतरित (डीबीटी) केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. मान्सूनचे आगमन आणि खरिपाची पेरणी सुरू होण्यापूर्वी शेतकर्‍यांना कर्जमुक्त करणे आणि त्यांना नवीन पिकासाठी ताजी आर्थिक रसद पुरवणे, हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे 30 जून ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. चालू वर्षाच्या मान्सून अंदाजाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, यंदा राज्यात एल-निनोमुळे सरासरीच्या 82 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात थोडी आव्हानात्मक परिस्थिती राहू शकते. बाजारात बियाणांची टंचाई भासणार नाही आणि बोगस बियाणांची विक्री होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत. सरकारच्या या चौफेर नियोजनामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकर्‍यांसाठी अधिक सुकर आणि समृद्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Loan waiver for farmers till June 30

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

13 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

13 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

13 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

13 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

13 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

13 hours ago