रमाबाईनगरात पहिल्याच पावसात दुर्घटना
मनमाड : प्रतिनिधी
मनमाड शहरात मान्सूनच्या पहिल्याच मुसळधार पावसाने भीषण थैमान घातले असून, येथील मातोश्री रमाबाईनगर भागात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. जोरदार पावसामुळे राहते घर अचानक कोसळल्याने घराचे मालक संजय विठ्ठल संसारे यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी या घटनेत गंभीर जखमी झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मनमाड शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, या पहिल्याच पावसाचा प्रचंड जोर संसारे यांच्या घराला सहन झाला नाही आणि ते अचानक पत्त्यांसारखे कोसळले.
घर कोसळल्याचा मोठा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. नागरिकांनी ढिगार्याखाली अडकलेल्या पती-पत्नीला बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस पथकानेही घटनास्थळी धाव घेतली. ढिगार्याखालून बाहेर काढल्यानंतर जखमी संजय संसारे व त्यांच्या पत्नीला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान संजय संसारे यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या गंभीर जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
आर्थिक मदतीची मागणी
मनमाडमधील घरांची आणि नागरी सुविधांची दैना समोर आणली आहे. संसारे यांच्या दुर्दैवी जाण्याने मातोश्री रमाबाईनगर परिसरासह संपूर्ण मनमाड शहरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत संजय संसारे यांच्या कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
Manmad: Husband dies after house collapses; wife injured
- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…
- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…
- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…
- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…
- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…