श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनांकडे कल वाढण्याची शक्यता
निफाड : विशेष प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या पडताळणी मोहिमेत नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आल्याने हजारो महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे.
पडताळणीदरम्यान अनेक महिलांचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक असल्याचे तसेच काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळत असल्याचे समोर आले. त्यामुळे अशा लाभार्थींना योजनेतून वगळण्यात आले आहे. आता त्या महिलांनी शासनाच्या इतर सामाजिक सुरक्षा योजनांकडे मोर्चा वळविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अनेक महिला राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, तसेच संजय गांधी निराधार योजना यासाठी अर्ज करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. विशेषतः 65 वर्षांवरील महिलांमध्ये श्रावणबाळ योजनेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेंतर्गत वार्षिक उत्पन्न 21 हजारांंपेक्षा कमी असलेल्या महिलांना दरमहा 1,500 रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या अनेक वृद्ध महिलांनी या योजनेचा आधार घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे, 65 वर्षांखालील महिला व तरुणी संजय गांधी निराधार योजनेत अर्ज करत आहेत. या योजनेसाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21 हजारांंपर्यंत असणे आवश्यक आहे. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही मर्यादा 50 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. या योजनेतून सामान्य लाभार्थींना दरमहा 1,500 रुपये, तर दिव्यांग लाभार्थींना 2,500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनांसाठी अर्ज करताना तलाठ्यांकडून उत्पन्नाचा दाखला तसेच महिला व बालविकास विभागाकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे महसूल व महिला-बालविकास विभागाच्या कार्यालयांमध्ये अर्जदारांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
Thousands of women found ineligible in Ladki Bhahin Yojana verification
- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…
- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…
- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…
- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…
- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…