नाशिक

भाव नसल्याने झेंडूचा बाजार कोमेजला!

कवडीमोल दरामुळे उत्पादक हिरमुसला

नाशिक : प्रतिनिधी
प्रकाशाचा उत्सव असणार्‍या दिवाळीमध्ये झेंडूच्या फुलांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र, दसर्‍यापासून झेंडूच्या फुलांना मागणी वाढूनही बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने भावात कमालीची घसरण झाली. परिणामी शेतकर्‍यांच्या पदरात दिवाळीलाही काहीच पडले नाही. कवडीमोल भावात झेंडूच्या फुलांची विक्री करावी लागली.
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला बाजारात झेंडूच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. सकाळी दोनशे रुपयांना असणारी झेंडूच्या फुलांची जाळी काल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 80 ते 100 रुपयांवर आली होती. फुलांचा भावही तीस रुपये प्रतिकिलो वा शेकड्यावर आला. अनेकांनी तर काल दुपारनंतर राहिलेले फुले रस्त्यावरच टाकून देणे पसंत केले. दिवाळीच्या दिवसांत झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. घर, गाडी, दुकाने यांना झेंडूच्या फुलांचे हार घालण्याबरोबरच लक्ष्मीपूजनाच्या सजावटीतही झेंडूच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, यंदा फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने भाव प्रारंभीपासूनच कमी राहिले. दसर्‍याला झेंडूच्या फुलांचा बाजार पडला होता. दिवाळीत तरी चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती. मात्र, दिवाळीतही झेंडूच्या फुलांचे भाव कमालीचे घसरले. ऐन दिवाळीत शेतकर्‍यांना मोठा आधार झेंडूच्या फुलांच्या विक्रीतून मिळणार होता. मात्र, शेतकर्‍यांच्या पदरात काहीच पडले नाही. कमी वेळात अधिक उत्पन्न मिळून देणारे उत्पादन म्हणून झेंडूच्या फुलांकडे पाहिले जाते. तथापि, यंदा जिल्हाभरात झेंडूच्या फुलांचे उत्पादन चांगले राहिले. मनमाड, चांदवड, पानेवाडी या भागात झेंडूच्या फुलांचे उत्पादन चांगले झाले. बाजारात आवक वाढल्याचा परिणाम भावावर होऊन भाव कमालीचे कोसळले. क्रेट्सला शंभर ते दीडशे रुपये दर मिळाला. त्यामुळे शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चदेखील वसूल होऊ शकला नाही.
शहरात आदल्यादिवशीच अनेक शेतकरी फुले विक्रीसाठी आणतात. दोन दिवस नाशिकमध्येच मुक्काम ठोकून रस्त्याच्या कडेला झेंडूच्या फुलांची विक्री करतात. मात्र, यंदा भावच न मिळाल्याने अनेक विक्रेत्यांची फुले तशीच पडून राहिली. सुकलेली फुले घरी घेऊन जाण्याऐवजी शेतकर्‍यांनी आहे तिथेच टाकून देणे पसंत केले. शहरात काल दुपारपर्यंत फुलांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली.

Marigold market wilts due to lack of good prices!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

ऐकणारे कान…

- सुप्रिया सुरवाडे सध्याचा घडीला माणसाला काय हवं आहे माहिती...? या शुष्क होत जाणार्‍या जगात...कोरड्या…

8 hours ago

नरक चतुर्दशी

- जगन घाणेकर स्त्रीसन्मानाचा आणि उदारतेचा संदेश देणारी वसुबारस आणि धनत्रयोदशी हे दिवाळीतीलच सण असले,…

8 hours ago

दीपावलीचा आनंद द्विगुणित व्हावा!

- आनंदा जाधव एरवी दीपावलीत पंधरा दिवस अगोदर गजबणार्‍या बाजारपेठेत यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे वसुबारसपासून गर्दीचा…

8 hours ago

’स्वीकृत’च्या निवडणुकीतील फुसका फटका

- गोरख काळे कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राज्यात ऐन दिवाळीत राजकीय फटाक्यांची जोरदार आतषबाजी…

8 hours ago

बायबाय ‘सीआर सेव्हन’!

- सचिन अहिरराव मैदानावर चेंडू पायाशी आला की, प्रतिस्पर्ध्यांच्या काळजाचा ठोका चुकायचा... वेगवान धाव, चपळ…

8 hours ago

माळी कुटुंबाने दुःखाच्या अंधारात पेटवला माणुसकीचा दिवा

पतीच्या मेंदूमृत्यूनंतर पत्नीचा अवयवदानाचा हृदयस्पर्शी निर्णय नाशिक : प्रतिनिधी दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि नव्या…

8 hours ago