नाशिक

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 8 ते 14 नोव्हेंबर 2026

मेष : कामे सुरळीत होतील

सणासुदीचे दिवस आहेत. दिवाळीचे दिवस आनंदाने साजरे करा. बाकी दिवस चांगले असतील. चांगल्या दिवसांमध्ये घेतलेले निर्णय योग्य राहतील. व्यवसायात गुंतवणूक करणे त्रासाचे राहील. नोकरदारवर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक व्यवहाराला गती येईल. मात्र, व्यवहार जपून करा. मित्र- मैत्रिणीच्या सदिच्छा मिळतील. संततीसौख्य लाभेल.

वृषभ : आनंद लाभेल

या आठवड्यात सर्व दिवस चांगले आहेत. दिवाळीचे हे दिवस अविस्मरणीय राहतील. धावपळ होईल, पण ती चांगल्या कामासाठी होईल. प्रसन्न वाटेल. व्यावसायिक भरभराट राहील. नोकरदारवर्गाला कामातील अडथळे दूर होतील. आर्थिक लाभ होईल. घरगुती वातावरण आनंदाचे राहील. धार्मिक गोष्टींसाठी वेळ द्याल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन : सौख्य लाभेल

‘आनंदी आनंद गडे इकडेतिकडे चोहीकडे’ असे वातावरण असणार आहे. दिवाळीचा सण आनंदाने साजरा कराल. सध्या मनोरंजनाचे दिवस आहेत, असे म्हणायला हरकत नाही. व्यवसायात अपेक्षित फायदा होईल. नोकरदारवर्गाचे काम सुरळीत चालू राहील. आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. राजकीय क्षेत्रातील ताणतणाव कमी होईल. घरगुती वातावरण चांगले राहील. मनोबल वाढेल.

कर्क : आनंद द्विगुणित होईल

दिवाळीमध्ये तुमचा आनंद द्विगुणित होईल. या सणासुदीच्या दिवसांत करमणुकीचा आनंद लुटाल. सर्वांसोबत सण साजरा कराल. काम वेळेत पूर्ण होणार आहे. कामातील उत्साह वाढेल. व्यवसायात गुंतवणूक करायला हरकत नाही. नोकरदारवर्गाला कामाच्या संदर्भात योग्य ते निर्णय घेता येतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कुटुंबातील मतभेद दूर होतील.

सिंह : आर्थिक व्यवहार सांभाळा

दिवाळी आनंददायी ठरणार आहे. कोणतीही गोष्ट नियोजनाशिवाय करू नका. शिवाय कोणावर अवलंबून राहू नका. आपल्या मर्यादा सांभाळा. व्यवसायात जे चालले आहे ते ठीक समजून पुढे चला. नोकरदार वर्गाने कामाकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिकदृष्ट्या बचत करणे योग्य राहील. राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप टाळा. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका.

कन्या : आर्थिक व्यवहार जपून करा

दिवाळी आनंदात साजरी करा. मागील गोष्टींवरून वादविवाद करू नका. चर्चा करणे टाळा. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात उलाढाल वाढेल. नोकरदारवर्गाला कामात पूर्णपणे गुंतून राहावे लागेल. आर्थिक व्यवहार जपून करा. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. घरगुती वातावरण चांगले राहील. मानसिक-शारीरिक स्वास्थ्य जपा.

तूळ : देवाणघेवाण टाळा

दिवाळीच्या दिवसांमध्ये आर्थिक नियोजन करा. काम करायला पाहिजे ते बाजूला राहील. चिडचिड होईल. संयम ठेवा. चांगल्या दिवसांमध्ये महत्त्वाचे काम मार्गी लागेल. व्यवसायात कोणावर अवलंबून राहू नका. नोकरदारवर्गाला कामाच्या बाबतीत योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. आर्थिक देवाणघेवाण टाळा. सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना भान ठेवा.

वृश्चिक : भाग्योदय होईल

भाग्योदयाचाही सप्ताह आहे. सणावाराचे दिवस आनंदाने साजरे होतील. हा सण तुम्ही सर्वांसोबत साजरा कराल. व्यावसायिकदृष्ट्या प्रगती होईल. नोकरदारवर्गाला वरिष्ठांकडून चांगल्या कामाची पोचपावती मिळेल. आर्थिक भार हलका होईल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा होईल. नातेवाइकांच्या शुभेच्छा मिळतील. मानसिक समाधान लाभेल.

धनु : लाभ होतील

दिवाळीचे दिवस आनंदात जातील. सकारात्मक विचार करा. स्वत:चे काम स्वत:च करा. मनाला आवर घाला. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. वसुबारस आणि धनत्रयोदशी हे दिवस चांगले असतील. व्यवसायात लाभदायक परिस्थिती निर्माण होईल. नोकरदारवर्गाला नवीन कामाची सुरुवात करावी लागेल. कुटुंबाची काळजी घ्या. ताणतणाव घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्या.

मकर : आर्थिक लाभ होतील

दिवाळी आनंदात साजरी होईल. स्वत:चे काम स्वत:लाच करावे लागेल. संयम ठेवा. व्यवसायातील परिस्थितीत बदल होईल. नोकरदारवर्गाला कामात गुंतावे लागेल. आर्थिकदृष्ट्या समाधानाची बाब राहील. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा होईल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा. विश्रांती घ्या.

कुंभ : नोकरीत बदलाचे योग

दिवाळीच्या या दिवसांचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करा. वादविवाद होणार आहेत अशा ठिकाणी शांत राहा. तुमची प्रतिक्रिया देऊ नका. इतरांना सल्ला देणे टाळा. आर्थिक देवाणघेवाण टाळा. व्यवसायात गुंतवणूक टाळा. नोकरदारवर्गाने कामाकडे लक्ष द्यावे. आर्थिक बचत करा. आरोग्याची काळजी घ्या. नातेवाईकांच्या शुभेच्छा मिळतील.

मीन : आनंद लाभेल

दिवाळीत शुभ गोष्टींची सुरुवात होईल. दिवाळी आनंदात साजरी करा. व्यवसायातील आवक वाढेल. नोकरदारवर्गाने नियमांचे पालन करावे. खर्च जपून करा. समाजसेवा कराल. घरगुती वातावरण चांगले राहील. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा होईल. नातेवाइकांच्या शुभेच्छा मिळतील. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा. मानसिक-शारीरिक स्वास्थ्य जपा.

 

Weekly Horoscope

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

ऐकणारे कान…

- सुप्रिया सुरवाडे सध्याचा घडीला माणसाला काय हवं आहे माहिती...? या शुष्क होत जाणार्‍या जगात...कोरड्या…

8 hours ago

नरक चतुर्दशी

- जगन घाणेकर स्त्रीसन्मानाचा आणि उदारतेचा संदेश देणारी वसुबारस आणि धनत्रयोदशी हे दिवाळीतीलच सण असले,…

8 hours ago

दीपावलीचा आनंद द्विगुणित व्हावा!

- आनंदा जाधव एरवी दीपावलीत पंधरा दिवस अगोदर गजबणार्‍या बाजारपेठेत यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे वसुबारसपासून गर्दीचा…

8 hours ago

’स्वीकृत’च्या निवडणुकीतील फुसका फटका

- गोरख काळे कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राज्यात ऐन दिवाळीत राजकीय फटाक्यांची जोरदार आतषबाजी…

8 hours ago

बायबाय ‘सीआर सेव्हन’!

- सचिन अहिरराव मैदानावर चेंडू पायाशी आला की, प्रतिस्पर्ध्यांच्या काळजाचा ठोका चुकायचा... वेगवान धाव, चपळ…

8 hours ago

माळी कुटुंबाने दुःखाच्या अंधारात पेटवला माणुसकीचा दिवा

पतीच्या मेंदूमृत्यूनंतर पत्नीचा अवयवदानाचा हृदयस्पर्शी निर्णय नाशिक : प्रतिनिधी दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि नव्या…

8 hours ago