75 वर्षांपासूनची मिरवणूक परंपरा
नाशिक : मुकुंद बाविस्कर
‘ईश्वर अल्लाह एक हैं।’ असा मानवतावादी संदेश जगाला देऊन सर्वधर्म, पंथ आणि समाजात एकता आणि एकात्मता निर्माण करणार्या भगवान झुलेलाल यांच्या कार्याचा आदर्श घेऊन नाशिक शहरातील सिंधी समाजबांधव गेल्या साडेसात दशकांपासून एकात्मतेचा संदेश देण्यासाठी मिरवणूक काढून चेटीचंड मेळावा घेत आहेत. विशेष म्हणजे, या मिरवणुकीत मानवतावादाची शिकवण देणार्या सर्वधर्मपंथांच्या महापुरुषांचे सजीव देखावे साकारण्यात येतात.
सिंधी समाजबांधवांची उपास्य देवता भगवान झुलेलाल यांना वरुण तथा जलदेवता मानण्यात येते. वरुणदेवतेला सागर देवता मानून सत्याचे रक्षणकर्ता समजून या रूपात भगवान झुलेलाल यांची सिंधी समाजबांधव पूजा करतात. जल हेच जीवन असून, त्यापासूनच सर्व सुखाची प्राप्ती होते, अशी या समाजाची धारणा आहे. जल-ज्योती, वरुणावतार आणि झुलेलाल सिंधी समाजाची इष्ट देवता असून, त्यांचे पूजन करण्यात येते. इष्टदेवतेचे पूजन करून सर्व विश्वात सुख-शांती आणि समृद्धीसाठी सिंधी समाजबांधव कामना करतात. भगवान झुलेलाल यांचा जन्म सिंध प्रांतात झाला असून, भगवान झुलेलाल यांना वरुण देवतेचा अवतार मानले जाते. त्यांचा जन्म दहाव्या शतकात झाला. त्यांना हिंदूंप्रमाणेच अन्य पंथ व धमार्ंतील लोकही मानतात.
सुफी संत म्हणूनही त्यांची पूजा करण्यात येते. काही भाविक त्यांना जलदेवतेचा अवतार मानतात, असे समाजाचे कार्यकर्ते मुकेश बालेचा यांनी सांगितले. सिंध प्रांतात भगवान झुलेलाल यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली. सिंध प्रांतातील हा समाज सिंधी समाज म्हणून ओळखला जाऊ लागला. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर सिंधमधील सिंधी समाज अनेक शहरांमध्ये विखुरला गेला. या समाजाने अनेक उद्योग-व्यवसायांत पदार्पण करून आपला ठसा उमटवला आहे, असे सांगून वालेचा म्हणाले की, मराठी नववर्षाप्रमाणेच सिंधी समाजाच्या नववर्षास चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरुवात होते. त्यानिमित्त मिरवणूक काढून मुख्य रथात झुलेलाल यांची मूर्ती ठेवण्यात येते. उर्वरित रथात देवदेवतांची वेशभूषा असलेले भाविक सहभागी होतात. सतनादास गुरू, शिर्डीचे साईबाबा आणि अन्य महापुरुषांची वेशभूषा केलेले तरुण यात असतात.
सिंधी समाज या दिवशी जलदेवता तसेच झुलेलाल यांची पूजा करतो. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येते. मिरवणुकीत भाविकांना तसेच मार्गावरील नागरिकांना फुटाणे व छोले, गोडभात प्रसाद म्हणून वाटप करण्यात येतो. मिरवणुकीची सांगता गंगाघाटावर होऊन येथे हजारो बांधवांना महाप्रसाद वाटप करण्यात येतो. या कार्यासाठी सिंधी पंचायतीचे पदाधिकारी व समाजबांधवांचा सहभाग असतो.
भगवान झुलेलाल जयंतीचे महत्त्व
भगवान झुलेलाल जयंतीला तिच्या धार्मिक व सांस्कृतिक पैलूंच्या पलीकडेही महत्त्व आहे. ही जयंती सहिष्णुता, करुणा व सर्वसमावेशकता या मूल्यांची आठवण करून देते. झुलेलाल यांची कथा धार्मिक भेदांच्या पलीकडे जाऊन, विविध धर्मांच्या लोकांमध्ये परस्परआदर आणि सामंजस्याचे महत्त्व अधोरेखित करते. आजच्या जगात, जिथे युद्ध तसेच संघर्ष आणि मतभेद दिसून येत आहेत, तसेच जगातील काही लोक एकतेच्या भावनेवर आघात करतात, तिथे भगवान झुलेलाल यांचा संदेश अत्यंत प्रभावी ठरतो. त्यांची शिकवण आपल्याला विविधतेचा स्वीकार करण्यास, सलोखा वाढवण्यास आणि अधिक शांततापूर्ण व सर्वसमावेशक समाज घडविण्यासाठी कार्य करण्यास प्रेरित करते. भगवान झुलेलाल जयंती किंवा चेटीचंड हा केवळ एक धार्मिक सण नसून, श्रद्धा, दृढनिश्चय आणि एकतेचा उत्सव आहे. झुलेलाल यांनी सांगितलेल्या मूल्यांवर चिंतन करण्याची आणि ती आपल्या जीवनात अंगीकारण्याची ही वेळ आहे. हा शुभ दिवस साजरा करत असताना, आपण प्रेम, शांती आणि बंधुत्वाच्या तत्त्वांचे पालन करण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून भगवान झुलेलाल यांच्या वारशाचा सन्मान होईल. त्यांचा एकतेचा संदेश जगाच्या कानाकोपर्यांत पोहोचेल.
विविध सांस्कृतिक कार्यक्रम
भारतातील, तसेच राज्यातील काही शहरांत या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. भगवान झुलेलाल यांची पूजा करण्यासाठी मंदिरांमध्ये लोक जमतात, जिथे भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या दिवशी व्यावसायिक नवीन हिशेबाची पुस्तके सुरू करतात. सिंधी लोक आपली कार्यालये, दुकाने बंद ठेवतात. कारण या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्यात येतो. सिंधी समाजात या दिवसाला अत्यंत आदराचे स्थान असून, तो अत्यंत शुभ मानला जातो. या सणाला चेटीचंड असे नाव मिळण्याचे कारण म्हणजे, सिंधी महिन्यातील चेत (चैत्र) महिन्यात अमावास्येनंतर (अंधारपखानंतर) या दिवशीच नवीन चंद्र (कोर) प्रथम दर्शन देतो. जीवनामृत मानल्या जाणार्या पाण्याची या दिवशी पूजा केली जाते. विशेष म्हणजे, भगवान झुलेलाल यांच्या जन्माशी संबंधित अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. या दिवशी सिंधी लोक भगवान झुलेलाल यांची मूर्ती आणि बेहराणासाहेब (ज्यात तेलाचा दिवा, खडीसाखर, वेलची, द्राक्षे आणि अखो म्हणजे दूध, पिठात कालवलेले तांदळाचे काही दाणे यांचा समावेश असतो.) सोबत घेऊन नदी, तलाव किंवा जलाशयापाशी जातात. गव्हाच्या पिठापासून बनवलेला, पाच वातींचा ज्योत जगन हा दिवा प्रज्वलित केला जातो. त्यानंतर बेहराणासाहेबचे पाण्यात विसर्जन केले जाते. त्यापाठोपाठ आशीर्वाद मागण्यासाठी पल्लव गायले जाते. सर्वांना प्रसाद वाटप केले जाते. सिंधी लोक गरजूंना अन्न व वस्त्रेे दान करण्यासारखे उपक्रमही राबवतात. हा दिवस कुटुंब व नातेवाइकांसोबत घालवण्याचा, तसेच सर्वांनी एकत्र बसून रुचकर भोजनाचा आस्वाद घेण्याचाही दिवस असतो.
- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…
- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…
- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…
- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…
- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…