नाशिक

मनपा कर्मचार्‍यांसह अधिकार्‍यांना आता मिळणार वैद्यकीय भत्ता

तिजोरीवर महिन्याला पडणार 48 कोटींचा भार

नाशिक : प्रतिनिधी
महापालिका प्रशासनाने जवळपास पंधरा वर्षांनंतर कर्मचारी, अधिकार्‍यांच्या वैद्यकीय भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी एक हजार हा भत्ता दिला जायचा. आता मात्र वैद्यकीय भत्त्यात आयुक्तांनी एक हजार रक्कम वाढ करून दरमहा दोन हजार रुपये करण्यात आला आहे. दरम्यान, यामुळे पालिकेच्या तिजोरीवर महिन्याला 48 कोटींचा भार
पडणार आहे.
महापालिकेच्या आस्थापनेवर सुमारे चार हजारांहून अधिक कर्मचारी कायम आहेत. वैद्यकीय भत्त्यात एक हजाराने वाढ झाल्याने महापालिकेच्या तिजोरीवर दरमहा चार ते साडेचार कोटी तर वर्षाला सुमारे 48 कोटींचा भार पडणार आहे. सुधारित वैद्यकीय भत्त्यामुळे येणारा वाढीव खर्च विहित लेखाशीर्षअंतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात येणार असून, नियमित वेतनश्रेणीत नेमणूक झालेल्या परिविक्षाधीन कालावधीतील मनपा सेवकांची अर्हताकारी दोन वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतरच अनुज्ञेयतेनुसार सदरचा वैद्यकीय भत्ता दिला जाईल. मनपा प्रशासनाने वैद्यकीय भत्त्यात वाढ केल्यामुळे कर्मचारी तसेच कर्मचारी संघटनांकडून या आदेशाचे स्वागत केले जात आहे.
मनपा कर्मचार्‍यांना मासिक वेतनामध्ये भत्ता मंजूर करण्यात आला आहे. सुधारित वैद्यकीय भत्ता दि. 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. बाह्ययंत्रणेने भरण्यात येणार्‍या पदांना प्रस्तावित वैद्यकीय भत्ता अनुज्ञेय असणार नाही. याची दक्षता घेण्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित विभागाची असेल, अशी सूचनाही आयुक्तांनी आपल्या आदेशात केली आहे.

मानधन कर्मचार्‍यांना लाभ नाही

मानधन तसेच रोजंदारीवर सुमारे एक ते दीड हजार इतके कर्मचारी महापालिकेच्या सेवेत आहेत. फिक्स पेवर रोजंदारीवर व मानधनावर नियुक्त कर्मचार्‍यांना सदरचा वैद्यकीय भत्ता मिळणार नसल्याचे मनपा प्रशासनाने महासभेत सादर केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.

Municipal employees and officials will now get medical allowance

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…

19 hours ago

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

19 hours ago

साखर कारखानदारीची घरघर थांबणार कधी?

- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…

19 hours ago

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

19 hours ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

19 hours ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

19 hours ago