नाशिक

येवला-मनमाड-मालेगाव मार्गावर अवजड वाहतुकीला वेळेची मर्यादा

नाशिक : प्रतिनिधी
येवला-मनमाड-मालेगाव मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने अवजड वाहनांच्या वाहतुकीवर वेळेची मर्यादा घातली आहे. 24 मार्च 2026 पासून या मार्गावर अवजड वाहतूक रात्री 10 ते सकाळी 7 या वेळेतच सुरू ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अधिसूचनेद्वारे जारी केला आहे. यावेळेव्यतिरिक्त अवजड वाहनांना या मार्गावरून प्रवेश बंद राहील.
मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल जनहित याचिका क्रमांक 46/2023 मधील आदेशानुसार छत्रपती संभाजीनगरकडून धुळ्याकडे जाणारी अवजड वाहतूक औट्रम घाटातून कन्नडमार्गे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ही वाहतूक वैजापूर-येवला-मनमाड-धुळे या मार्गाने वळविण्यात येत आहे. परिणामी, येवला-मनमाड मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
या पाश्वर्र्भूमीवर नागरिक व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अवजड वाहतुकीवर वेळेची मर्यादा लागू करण्यात आली आहे.

कोणत्या वाहनांना सूट

रुग्णवाहिका
पोलीस व अग्निशमन दलाची वाहने
राज्य शासनाच्या प्रवासी बस
आरोग्य विभागाची आपत्कालीन वाहने
क्रेन व नादुरुस्त वाहने घेऊन जाणारी क्रेन

आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई

भारतीय न्याय संहितेेंतर्गत कारवाई
मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई
सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देश.

Time limit for heavy traffic on Yeola-Manmad-Malegaon route

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…

20 hours ago

देशातील तपास यंत्रणा

- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्‍यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…

20 hours ago

साखर कारखानदारीची घरघर थांबणार कधी?

- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…

20 hours ago

…आणि मी प्रेमात पडतो!

- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…

20 hours ago

समाजकल्याण की कोटकल्याण?

- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…

20 hours ago

दिवाळीचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचू द्या!

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…

20 hours ago