नाशिक

बनावट आधारकार्ड, पॅनकार्डच्या आधारे भूखंड परस्पर विक्री

 

सिडको : प्रतिनिधी
मालमत्तेच्या मूळ मालकाच्या नावाने बनावट व्यक्ती उभी करून तसेच बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड आणि अन्य कागदपत्रांच्या आधारे पाथर्डी शिवारातील 360 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील वघई येथील रहिवासी सतीश प्रकाश जगताप (वय 63, व्यवसाय हॉटेल व्यावसायिक) यांच्या मालकीचा नाशिक महानगरपालिका हद्दीतील पाथर्डी शिवारात सर्व्हे क्रमांक 243/1/2/3 मधील प्लॉट क्रमांक 52 हा 360 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड आहे.
संशयितांनी संगनमत करून या भूखंडाची परस्पर विक्री करण्याचा कट रचला. त्यानुसार नाशिक येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयात दस्त क्रमांक 11031/2026 अन्वये विक्रीखताची नोंदणी करण्यात आली. यावेळी सतीश प्रकाश जगताप यांचे नाव धारण करणार्‍या एका बनावट व्यक्तीला मालक म्हणून उभे करण्यात आले.
त्यासाठी मूळ मालकाच्या नावाचे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड आणि अन्य कागदपत्रे तयार करण्यात आली. तसेच बनावट सह्या आणि अंगठे करून मूळ मालकाची कोणतीही संमती किंवा परवानगी नसताना भूखंडाची परस्पर विक्री करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी सुधीर तुळशीराम लोणारी (रा. पाथर्डी फाटा, नाशिक), सादिक मोहम्मद हनीफ पठाण (रा. मारुती चेंबर, जिल्हा न्यायालय आवार, नाशिक), सतीश प्रकाश जगताप हे नाव धारण करणारा बनावट इसम आणि त्यांच्या अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mutual sale of plots based on fake Aadhaar card, PAN card

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

ऐकणारे कान…

- सुप्रिया सुरवाडे सध्याचा घडीला माणसाला काय हवं आहे माहिती...? या शुष्क होत जाणार्‍या जगात...कोरड्या…

7 hours ago

नरक चतुर्दशी

- जगन घाणेकर स्त्रीसन्मानाचा आणि उदारतेचा संदेश देणारी वसुबारस आणि धनत्रयोदशी हे दिवाळीतीलच सण असले,…

7 hours ago

दीपावलीचा आनंद द्विगुणित व्हावा!

- आनंदा जाधव एरवी दीपावलीत पंधरा दिवस अगोदर गजबणार्‍या बाजारपेठेत यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे वसुबारसपासून गर्दीचा…

8 hours ago

’स्वीकृत’च्या निवडणुकीतील फुसका फटका

- गोरख काळे कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राज्यात ऐन दिवाळीत राजकीय फटाक्यांची जोरदार आतषबाजी…

8 hours ago

बायबाय ‘सीआर सेव्हन’!

- सचिन अहिरराव मैदानावर चेंडू पायाशी आला की, प्रतिस्पर्ध्यांच्या काळजाचा ठोका चुकायचा... वेगवान धाव, चपळ…

8 hours ago

माळी कुटुंबाने दुःखाच्या अंधारात पेटवला माणुसकीचा दिवा

पतीच्या मेंदूमृत्यूनंतर पत्नीचा अवयवदानाचा हृदयस्पर्शी निर्णय नाशिक : प्रतिनिधी दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा आणि नव्या…

8 hours ago