शिवसृष्टीसाठी भूमिपूजन; एक गाव-एक शिवजयंती संकल्पनेतून प्रकल्प
चांदवड : प्रतिनिधी
ऐतिहासिक चांदवड शहराच्या वैभवात मानाचा तुरा रोवणारा क्षण शिवजयंतीच्या मुहूर्तावर अनुभवायला मिळाला. शहराच्या मध्यवर्ती बाजारतळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याची उभारणी आणि भव्य शिवसृष्टीनिर्मिती या आठ कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा ऐतिहासिक शुभारंभ आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या हस्ते उत्साहात झाला.
शहरात ‘एक गाव-एक शिवजयंती’ या संकल्पनेतून स्थापन झालेल्या चांदवड युवा प्रतिष्ठान व कार्यवाह समितीने या स्मारकासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश मिळवून देण्यासाठी आमदार डॉ. राहुल आहेर आणि समितीचे अध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी शासनस्तरावर विशेष प्रयत्न केले. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या विशेष सहकार्याने, आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या माध्यमातून पाच कोटी रुपये आणि प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत भूषण कासलीवाल यांच्या प्रयत्नांतून तीन कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. दरम्यान, ऐतिहासिक सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषण कासलीवाल यांनी भूषविले. कार्यक्रमास माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, नगराध्यक्ष वैभव बागूल, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन आहेर, संजय जाधव, बाळासाहेब माळी, डॉ. राजेंद्र दवंडे, डॉ. आत्माराम कुंभार्डे, भाजपा तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, अशोककाका व्यवहारे, विलासदादा ढोमसे, सुरेशदादा जाधव, बाळासाहेब कासलीवाल, आबा गांगुर्डे, युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
असे असेल शिवस्मारक
नगरपरिषदेच्या ठराव क्रमांक 287 (दि. 20 सप्टेंबर 2024) अन्वये, बाजारतळ येथील श्री हनुमान मंदिरासमोरील सिटी सर्व्हे नंबर 657 मधील त्रिकोणी खुल्या जागेत हे स्मारक उभारले जात आहे. या ठिकाणी महाराजांचा भव्य सिंहासनाधिष्ठित पुतळा आणि शिवकालीन इतिहासाची प्रचिती देणारी शिवसृष्टी साकारली जाणार आहे. या प्रकल्पामुळे इतिहासाची जपणूक आणि पर्यटनवृद्धी या दोन्ही गोष्टींना मोठी चालना मिळणार आहे.
कार्यवाहसमितीचा यशस्वी वाटा
भूषण जयचंद कासलीवाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये उपाध्यक्ष रवींद्र अहिरे व ज्ञानेश्वर भालेराव, सरचिटणीस सचिन निकम, चिटणीस कलीम पठाण व दयानंद गोखले, कोषाध्यक्ष सुनील डुंगरवाल, सदस्य दत्तात्रय बारगळ, जितेंद्र पाटील, सुभाष कोतवाल व महेश वाघ यांनी या प्रकल्पासाठी प्रशासकीय आणि शासनस्तरावर यशस्वी पाठपुरावा केला.
- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…
- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…
- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…
- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…
- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…