राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

नासाच्या ‘आर्टेमिस-2’ मिशनची यशस्वी सुरुवात

50 वर्षांनंतर चंद्राभोवती प्रदक्षिणा

नवी दिल्ली :
अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने आर्टेमिस-2 मिशन केनेडी अंतराळ केंद्रावरून यशस्वीरीत्या लाँच केले. अमेरिकेच्या वेळेनुसार, संध्याकाळी 6 वाजून 24 मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार, गुरुवारी पहाटे 3.54 वाजता) हे मिशन सुरू झाले. नासाच्या अपोलो मोहिमेनंतर 50 वर्षे कोणत्याही मानवाने पृथ्वीपासून इतका मोठा प्रवास केला नव्हता. नासाच्या ‘आर्टेमिस-2’ अभियानाद्वारे चार अंतराळवीर चंद्राभोवती एक प्रदक्षिणा घालतील आणि सुमारे दहा दिवसांनी पृथ्वीवर परततील.
नासाच्या या मोहिमेत चार अंतराळवीर सहभागी झाले आहे. विशेष म्हणजे नासाने आर्टेमिस 2 मिशनसाठी आवश्यक असलेली वेट टेस्टिंग पूर्ण केली नाही. यापूर्वी फेब्रुवारीत ही टेस्ट झाली त्यावेळी गळती होत असल्याचे समोर आले होते. पण ही अडचण दूर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आणि कोणत्याही चाचणीशिवाय आता यान हे चंद्राकडे झेपावले आहे.
मोहिमेचे खास वैशिष्ट्ये
आर्टेमिस-2 मोहिमेत अंतराळवीरांना चंद्राजवळ पोहोचण्यासाठी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. अपोलो मोहिमेतदेखील इतकाच कालावधी चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लागला होता.
आर्टेमिस-2 मोहिमेच्या माध्यमातून सिस्टिमचे निरीक्षण करण्यात येईल. यामध्ये आपत्कालीन प्रक्रिया, रेडिएशनच्या माध्यमातूनसुरक्षा आणि लेझरवर आधारीत अत्याधुनिक संवादाचे तंत्रज्ञान विकसीत होईल. ही मोहिम आगामी अंतराळ अभियानासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या मोहिमेअंतर्गत चंद्रावर पुन्हा मानवाला उतरवण्याचा आणि मंगळ ग्रहावर सुद्धा अंतराळवीराला उतरवण्याची तयारी करण्यात येत आहे. मोहिमेचा केवळ इतकाच एक उद्देश नाही. चंद्रावर मानवी वसाहत तयार करण्यासाठी आणि मंगळ ग्रहावरही वसाहतीचा प्रयोग राबवण्यासाठी ही मोहिम आवश्यक मानली जात आहे.

या अंतराळवीरांचा मोहिमेत सहभाग

नासाच्या आर्टेमिस-2 मोहिमेसाठी चार अंतराळवीरांचा समावेश करण्यात आला आहे. यात रीड वाईजमॅन (मोहीमप्रमुख), विक्टर ग्लोवर (मोहीमचालक), क्रिस्टिना कोच (मोहीम तज्ज्ञ) आणि कॅनडा येथील अंतराळ संस्थेचे सदस्य जैरेमी हँसन (मोहीम तज्ज्ञ) आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जवळपास एक वर्ष घालवलेल्या 47 वर्षीय कोच या चंद्राच्या परिसरात पोहोचणार्‍या पहिल्याच महिला अंतराळवीर ठरणार आहेत.

NASA’s Artemis-2 mission successfully launched

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago