राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

कोणतीही पदवी नाही, तरीही ’बीएमडब्ल्यू’मध्ये नोकरी!

19 वर्षीय भारतीय तरुणीच्या ‘लिंक्डइन’ पोस्टने वेधले जगाचे लक्ष

मुंबई : विशेष प्रतिनिधी
नोकरी मिळवण्यासाठी पदवी हवीच, या पारंपरिक समजाला छेद देणारी एक खळबळजनक घटना सध्या कॉर्पोरेट जगतात चर्चेचा विषय ठरली आहे. अवघ्या 19 वर्षांच्या एका भारतीय तरुणीने, कोणतीही पदवी (डिग्री) किंवा औपचारिक कॉर्पोरेट अनुभव नसताना, थेट ’बीएमडब्ल्यू’ सारख्या जागतिक ऑटोमोबाईल दिग्गज कंपनीत महत्त्वाची जागा पटकावली आहे. गौरी एम. असे या तरुणीचे नाव असून तिच्या एका लिंक्डइन पोस्टने सध्या इंटरनेटवर ’कौशल्य की पदवी’ अशी नवी चर्चा जोरात सुरू झाली आहे.
गौरीने नुकतीच सोशल मीडियावर आपली यशोगाथा शेअर केली. तिच्या दाव्यानुसार, तिला बीएमडब्ल्यू ग्रुपमध्ये ’पर्सनल मार्केटिंग’ या पदासाठी पूर्णवेळ नोकरीची ऑफर मिळाली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या पदासाठी कंपनीने अधिकृत जाहिरातीत किमान 5 वर्षांचा कामाचा अनुभव किंवा ’एमबीए’ सारखी उच्च पदवी अपेक्षित असल्याचे म्हटले होते. मात्र, गौरीकडे यापैकी काहीही नसताना तिची निवड झाली आहे.
अर्ज न करताच मिळाली ऑफर!
गौरीच्या पोस्टमधील सर्वात धक्कादायक आणि रंजक मुद्दा म्हणजे तिने या नोकरीसाठी कोणताही औपचारिक अर्ज केला नव्हता. मी कोणालाही पिच केले नाही, ना कोणताही ’कोल्ड ईमेल’ पाठवला. तरीही मला जगातील एका सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल ब्रँडकडून मार्केटिंग रोलसाठी थेट विचारणा झाली, असे गौरीने नमूद केले. एकाच आठवड्यात तिला अशा तीन मोठ्या कंपन्यांकडून ऑफर्स आल्याचेही तिने सांगितले आहे.
यशाचे गुपित: ’पर्सनल ब्रँडिंग’
गौरीला ही संधी मिळण्यामागे तिचे सोशल मीडियावरील सातत्यपूर्ण काम कारणीभूत ठरले आहे. तिने स्वतःची एक ’डिजिटल ओळख’ निर्माण केली होती:
लिंक्डइन: 65,000 हून अधिक फॉलोअर्स.
इन्स्टाग्राम: 35,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स.
तिने शेअर केलेले मार्केटिंग आणि ब्रँडिंग विषयावरील कंटेंट हेच तिचे ’रिझ्युमे’ (बायो डेटा) ठरले. कंपनीच्या रिक्रूटर्सनी तिचे प्रोफाइल पाहिले आणि तिच्या कामाची पद्धत आवडल्यामुळे तिला थेट संधी दिली.

No degree, yet a job at BMW!

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

13 minutes ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

21 minutes ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

26 minutes ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

32 minutes ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

38 minutes ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

52 minutes ago