सीईओ ओमकार पवार अॅक्शन मोडवर
नाशिक : प्रतिनिधी
महिनाभरातील तीन लाचखोरीच्या घटनांमुळे नाशिक जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन होत आहे. ही बाब प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने चिंताजनक असल्याने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यपद्धतीवर बडगा उगारत संपूर्ण यंत्रणेला सज्जड इशारा दिला आहे.
प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा, फाइल्सची सुरक्षित हाताळणी आणि कार्यालयीन शिस्त पाळण्याबाबत कठोर निर्देश देत गैरप्रकार आढळल्यास थेट निलंबनाची कारवाई केली जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांतील सर्व विभागप्रमुख तसेच गटविकास अधिकार्यांना आपल्या अधिनस्त प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन ती त्वरित निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनावश्यक विलंबामुळे भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असल्याचे निरीक्षण नोंदवत कामकाज पारदर्शक ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.
कार्यालयात विनाकारण फिरणार्या अधिकारी-कर्मचार्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अभ्यागत नोंदवही सक्तीची करण्यात आली असून, त्यासाठी स्वतंत्र परिचर नेमण्याचे
निर्देश दिले आहेत. तसेच फाइल्स केवळ अधिकृत कर्मचार्यांकडूनच हाताळल्या जाव्यात, अन्यथा त्रयस्थांकडे फाइल आढळल्यास संबंधितांवर थेट निलंबनाची कारवाई होईल, असा इशाराही देण्यात
आला आहे.
बांधकाम, लघुपाटबंधारे आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील फाइल्सबाबत विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले असून, कागदपत्रे गहाळ होणे किंवा गोपनीयता भंग होणे सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
बिलांना विलंब झाल्यास कारवाई
जिल्हा परिषद व पंचायत समितीतील बिले व देयके दीर्घकाळ प्रलंबित राहू नयेत, यासाठीही स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः वैद्यकीय बिलांना आरोग्य विभागाकडून तांत्रिक मान्यता देण्यात 15 दिवसांपेक्षा अधिक विलंब झाल्यास संबंधितांवर शिस्तभंग कारवाई करण्यात येणार आहे.
हालचाल रजिस्टर
याशिवाय, शासकीय कामानिमित्त बाहेर जाणार्या प्रत्येक अधिकारी व कर्मचार्यांनी हालचाल नोंदवहीत नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंद न करता बाहेर गेल्यास प्रथम निलंबन व त्यानंतर शिस्तभंग कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. लाचखोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि प्रशासनाची विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कडक पावले उचलल्याचे चित्र आहे.
Disciplinary action in the Zilla Parishad after bribery!
गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…
चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…
क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…
‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…
महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…