नाशिक

‘समता’ पतसंस्था व्यवहार प्रकरण : प्रतिभा चाकणकर यांना समन्स

शिर्डी : प्रतिनिधी
बहुचर्चित अशोक खरात आर्थिक घोटाळा प्रकरणात आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ’समता नागरी सहकारी पतसंस्थे’तील संशयास्पद व्यवहारांची चौकशी करण्यासाठी शिर्डी पोलिसांनी त्यांना अधिकृत नोटीस बजावली आहे.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर यांच्या नावे दोन आणि त्यांच्या मुलांच्या नावे दोन, अशी एकूण चार खाती असून त्यातून गेल्या काही काळात तब्बल 2 कोटी 40 लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत. या व्यवहारांचा स्रोत आणि अशोक खरात यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत विचारपूस करण्यासाठी त्यांना 7 दिवसांच्या आत चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणातील व्याप्ती मोठी असून सिन्नरच्या जगदंबा पतसंस्थेतील खात्यांचीही नाशिक पोलिसांकडून स्वतंत्र चौकशी सुरू आहे.

‘Samata’ credit union transaction case: Summons to Pratibha Chakankar

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

1 hour ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago