नाशिक

थेंबभरही पाणी मिळेना!

साईनाथनगरमधील रहिवाशांचे मनपाला साकडे

वडाळागाव : प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक 23 मधील साईनाथनगर परिसरात अनेक महिन्यांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाबाबत साईनाथनगर परिसरातील नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता (पाणीपुरवठा) रवींद्र धारणकर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
निवेदनात साईनाथनगर परिसरात अनेक ठिकाणी नळांना अत्यंत कमी दाबाने किंवा अजिबात पाणी येत नसल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावेळी नागरिकांनी परिसरातील जलवाहिन्यांची तपासणी, व्हॉल्व्हची पाहणी, गळती शोधून ती तातडीने दुरुस्त करणे, कुंभातील पाणीसाठ्याची पडताळणी करून नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. तसेच संबंधित अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष साईनाथनगर परिसराची पाहणी करून नागरिकांशी चर्चा करावी आणि या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन स्वीकारताना अधीक्षक अभियंता धारणकर यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत संबंधित अधिकार्‍यांकडून आवश्यक तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे नागरिकांनी सांगितले.

Not even a drop of water could be found!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago