नाशिक

नाशिकरोड-साईनगर शिर्डी रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाला विरोध

अधिसूचना रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
नाशिकरोड ते साईनगर शिर्डीदरम्यान प्रस्तावित दुहेरी रेल्वेमार्गासाठी करण्यात येत असलेल्या भूसंपादनाला नाशिक व सिन्नर तालुक्यातील बाधित शेतकर्‍यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रकल्पासाठी नवीन भूसंपादन करण्याऐवजी यापूर्वीच संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा, अशी मागणी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ स्थगित करून संबंधित अधिसूचना रद्द करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.
नाशिकरोड ते साईनगर शिर्डीदरम्यानच्या दुहेरी रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती शेतकर्‍यांना मिळाली आहे. रेल्वे विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण) भुवनेश कुमार गुप्ता यांनी अधिसूचना प्रसिद्ध करून नाशिकरोड ते साईनगर शिर्डीदरम्यानच्या सुमारे 95.059 किलोमीटर लांबीच्या विशेष रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे नाशिक तालुक्यातील विहितगाव, बेलतगव्हाण, चांदगिरी, जाखोरी, देवळाली, चेहेडी खुर्द, मोहगाव, बाभळेश्वर, पंचक, चाडेगाव, ब्राह्मणवाडे यांसह सिन्नर तालुक्यातील अनेक गावांमधील सुपीक शेतजमीन भूसंपादनाच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

भूसंपादन रद्द करा, अन्यथा आंदोलन
विद्यमान पर्याय उपलब्ध असतानाही नव्याने भूसंपादनाची प्रक्रिया राबविली जात असल्याने बाधित शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रस्तावित भूसंपादनास ठाम विरोध असून, अधिसूचना रद्द करून पर्यायी मार्गाचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास शेतकर्‍यांना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. त्यातून उद्भवणार्‍या परिस्थितीस संबंधित प्रशासन व रेल्वे विभाग जबाबदार राहतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकर्‍यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रस्तावित भूसंपादन प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी व अधिसूचना रद्द करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर विजय जाधव, अंकुश टिळे, रवी अस्वले, अमोल जाधव, दत्तू मानकर, शेखर अरिंगळे, दत्तू नागरे आदी बाधित शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Opposition to land acquisition for the Nashik Road-Sainagar Shirdi railway line.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिहस्थ सोहळ्यासाठी नाशिकमध्ये कडेकोट बंदोबस्त

तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…

4 days ago

झाडे तोडली तर पाखरांनी परत जायचे कुठे?

पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…

4 days ago

सत्ताधार्‍यांना धक्के

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…

4 days ago

कुंभमेळ्याच्या जागेसाठी शासनाने ठोस भुमिका घ्यावी

नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…

4 days ago

ध्वजारोहणासाठी शहर भगवेमय

चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…

4 days ago

फिरायला जाताय, एनसीएमसी कार्ड नोंदणी केली का?

आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…

4 days ago