format: 0; filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:8; brp_del_th:0.0092,0.0001; brp_del_sen:0.3000,0.3000; motionR: 0; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (11, 0);aec_lux: 100.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: 1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 39;
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाने शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या रामवाडी पूल येथील ड्रेनेज लाइनचे काम हाती घेतल्याने या पुलावरून दोन्हींकडील वाहतूक मार्ग बंद करण्यात आला होता. दरम्यान, हे काम मंगळवारी (दि. 9) रात्रीपर्यंत होईल, असेे
महापालिकेने सांगितले आहे.
शहरात कन्नमवार पूल, टाळकुटेश्वर मंदिर, मोदकेश्वर मंदिर, एकमुखी दत्त मंदिर आदी परिसरासह मुख्य मलवाहिका लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार रामवाडी पूल येथे बाराशे मिलिमीटर व्यासाच्या मुख्य मलवाहिकेचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.
दरम्यान, या कामासाठी
महापालिका प्रशासनाने रीतसर परवानी घेतली होती. ड्रेनेज लाइनचे काम हाती घेतल्याने खबरदारी व सुरक्षेच्या द़ृष्टीने या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली. पण याबाबतची माहिती वाहनधारकांना नसल्याने त्याचा फटका बसला. परिणामी अशोक स्तंभाच्या बाजूने व पंचवटीकडून येणार्या बाजूला वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते.
मुख्य मलवाहिका लाइनचे काम सुरू आहे. त्याकरिता रामवाडी पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मंगळवार रात्रीपर्यंत काम पूर्ण होणार आहे. – रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, मनलनिस्सारण विभाग, मनपा
दोन दिवस उलटूनही काम संपेना!
रामवाडी पुलाजवळ भुयारी गटार योजनेच्या क्रॉसिंगचे काम सुरू आहे. त्यासाठी दोन दिवस हा मार्ग बंद ठेवण्यात येणार होता. मात्र, दोन दिवस उलटूनही हे काम सुरूच असल्याने त्याचा फटका वाहतुकीला बसला आहे. अशोक स्तंभापासून तर रविवार कारंजापर्यंत कासवगतीने वाहने चालवण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे.
पावसाळ्यात गंभीर परिस्थितीची शक्यता
अशोक स्तंभ व रविवार कारंजा परिसरात आताच मोठी वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी पावसाळ्यात यापेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या परिसरात अनेक क्लासेस असल्याने महाविद्यालयीन तरुण-तरुणींची मोठ्या प्रमाणात या परिसरात वर्दळ असते. महाविद्यालयीन तरुण-तरुणींना वाहने चालवण्याचा कमी अनुभव असल्याने या वाहतूक कोंडीतून वाहने चालवताना त्यांना मोठे प्रयत्न करावे लागत आहेत.
Ramwadi bridge to open today
- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…
- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…
- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…
- प्रशांत पोतदार काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही. कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही…
- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…